Breaking News

1/breakingnews/recent

28 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - घोडेगाव कांदा मार्केट एक आठवडा बंद...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. प्रसिद्ध ग्रामदैवत कानिफनाथाची यात्रा आज रद्द  
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील प्रसिद्ध ग्रामदैवत कानिफनाथाची यात्रा आज रद्द करण्यात आली असुन एक दिवसासाठी गाव पुर्ण कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.हा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी व प्रशासनाने कोरोणा संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

2. घोडेगाव कांदा मार्केट एक आठवडा बंद
नेवासा बाजार समितीचे घोडेगाव उपबाजार आवारात असलेले कांदा मार्केट शनिवार पासून बुधवारपर्यंत असे एक आठवडा बंद राहणार आहे. मार्च अखेर  हिशोब तपासणीसाठी दरवर्षी तीन जिल्हा बंद येथील आडतदार व्यापारी यांच्याकडून बंद ठेवले जातात. 

3. दरोड्यातील टोळी जेरबंद दोघे फरार
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले तर तिघे उसाच्या शेतातून फरार झाले आहेत. 

4. विवाहितेला मारहाण आठ जणांविरुद्ध गुन्हा
माहेरून पाच लाख रुपये आनले नाही म्हणून विवाहितेला मारहाण करणाऱ्या पतीसह आठ जणांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली आहे पतीसह सासू सासरे नणंद यांनी मारहाण केली असल्याचं विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे

5. आरोग्य विभागात वरातीमागून घोडे  
चिंचोडी पाटील तालुका नगर येथील आरोग्य विभागाचे नगर तालुक्यातील एकमेव कोरोना सेंटर पंधरा डिसेंबर दोन हजार वीस पासून बंद करण्यात आले होते. तब्बल साडेतीन महिन्यानंतर काल ते सुरू करण्यात आले आहे. 

6. शिक्षक बँक ताळेबंदातच महाघोटाळा !
प्राथमिक शिक्षक बँकेत अनेक घोटाळे करुण थकलेल्या महाभागी सत्ताधारी मंडळांनी शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सभा अहवालाच्या ताळेबंदातच आता महाघोटाळा केला आहे.एक तर आपणाला प्रशासनाने अहवालच पाठविला नाही तो का पाठविला नाही याचे उत्तर आज शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळाला सापडले आहे. 

7. मोटर सायकल चोरली  
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथून चोरट्यांनी एक मोटरसायकल चोरून नेली 24 मार्च रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात रवींद्र दिगंबर लावर  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

8. 'मला' फक्त विकासाचे राजकारण करायचे आहे
लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो त्यात कधी बदल होत नसतो. आता इथले राजकारण बदलेल आणि विकासाच्या राजकारणाकडे सर्वांचा कल राहील.लोकांच्या हितासाठी जातीय राजकारण नाही तर फक्त विकासाच राजकारण करायचय असे मत आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले.कर्जत तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

9. तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा.
महाभकास आघाडीचे राज्याचे नेते तुम्ही स्वत:ला समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, असे थेट आव्हान पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिले. 

10. जिल्हा परिषद सदस्यांना मिळणार स्मार्ट फोन
कोरोनामुळे सध्या सार्वजनिक सभांना बैठकांना मनाई करण्यात आल्याने जिल्हा परिषदेतील अनेक सभा बैठका ऑनलाइन झाले आहेत. परंतु ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांकडे ऑनलाईन सभेत सहभागी होण्यासाठी स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आधी सुविधा नसल्याने त्यांना अनेक सन्मान पासून वंचित राहावे लागत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *