Breaking News

1/breakingnews/recent

26 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - १२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. भारतात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नों
भारतात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली आहे. 

2. महापौर निवडणुकीत भाजपला घेरण्याची महाविकास आघाडीची तयारी
सांगली, जळगाव महापालिकेत यशस्वी झालेला प्रयोग आता धुळे महापालिकेत राबवून भाजपला पायउतार करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. 

3. सेल्फीच्या नादात दोन भावंडांचा बुडून मृत्यू
धरणाच्या काठावर उभे राहून सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात पडून तालुक्यातील अजंग येथील दोघा भावांचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

4. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली असून देशभरात अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. 

5. पुढील काही महिन्यांसाठी निर्णय
देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर करोना लशींची देशातील मागणीच पुरवण्यावर भारत भर देणार असून; येत्या काही महिन्यांसाठी या लशींची निर्यात केली जाणार नाही, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी बुधवारी सांगितले.

6. रत्नागिरी परिसरात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारण्याची मोहीम
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या खात्याची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्य पातळीवर शैक्षणिक उपक्रम राबवतानाच रत्नागिरी शहर आणि जिल्ह््यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण करण्याचे धोरण अवलंबले असून राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत रत्नागिरीसाठी मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय याच धोरणाचा परिपाक आहे.

7. अल्पसंख्याकांच्या मतांवर डल्ला मारण्यासाठीच विरोधकांचा राज्यातील नव्या राजकीय पक्षाला पाठिंबा
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत अल्पसंख्याकांच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी भाजप नव्या राजकीय पक्षाला पाठिंबा देत असल्याचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी इंडियन सेक्युलर फ्रण्टच्या (आयएसएफ) संदर्भाने केला.

8. १२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु
करोनाची लस निर्माण करणाऱ्या फायझर कंपनीने गुरुवारपासून ११ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु केल्याची माहिती दिली आहे. जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचं मानलं जात आहे.

9. लष्कराचे मूल्यमापन निकष भेदभावजनक
अल्पकालीन नियुक्तीवरील महिला अधिकाऱ्यांच्या स्थायी नियुक्तीसाठी लष्कराने निश्चित केलेले मूल्यमापनाचे निकष भेदभावजनक आहेत.

10. ममता बॅनर्जी यांचा आरोप
निवडणूक आयोगाच्या (ईसी) कारभारामध्ये भाजप हस्तेक्षप करीत असल्याचा आरोप गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयोगाने सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, तरीही आमचा विजय कोणीही रोखू शकणार नाही, कारण जनता आमच्यासोबत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *