Breaking News

1/breakingnews/recent

26 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

   News24सह्याद्री - नगर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. नगर जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात काल सायंकाळी भूकंप झाला 

या भूकंपाचे हादरे पुणे जिल्ह्यालाही  जाणवले संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटामध्ये साडेचार वाजता भूकंपाचे धक्के बसले या भागात भूकंपाचे धक्के बसतात काल सायंकाळी साडेचार वाजता हा धक्का बसला , हा धक्का  कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये.

२. दोन बिबट्यांच्या मारामारीत एका  बिबट्याचा मृत्यू

राहाता तालुक्यातील एकरूखे येथे श्री सुधाकर जगन्नाथ सातव यांच्या गट नंबर २७१ एक बिबट्या मृत झाला.
आज सकाळी ९ वा. अस्तगाव रोड एकरूखे येथे  सुधाकर सातव यांच्या मकाच्या पिकामध्ये दोन बिबट्याच्या मारामारीत एक बिबटय़ा मृत झाला हि घटना सुधाकर सातव, प्रल्हाद कार्ले, अविनाश गाढवे यांनी पाहीली असता त्यांनी वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना फोन करून माहिती दिली.

3. श्रेगोंद्यात साडेसहा हजार नागरिकांनी घेतली लस

कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचा ही वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत युद्धपातळीवर सुरू आहे यात जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत सहा हजार सातशे सहा जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली असून 45 वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना एक एप्रिलपासून लसीकरणाची सुरुवात होणार आहे.

4. जिल्ह्यातील हा तालूका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
राहता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक वाढत असून राहता शहरात रोज 25 च्या पुढे रुग्ण आढळत आहेत  नुकत्याच  आलेल्या आकडेवारीनुसार राहता तालुक्यात कोरणा चा उद्रेक झाला 

५. श्रीरामपूर तालुक्यात आढळले  कोरोनाचे  69 रुग्ण
 जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरणा रुग्णसंख्या वाढलेली आहे त्यामुळे मोठी चिंता वाढली आहे  दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी पाहता जिल्ह्यात लॉक डाऊन होणार की काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागला श्रीरामपूर या तालुक्यात गेल्या 24 तासात सापडला तर 325 उपचार घेत आहेत.

6. लग्न लावून देण्याचा बनाव करून लुबाडणारी टोळी जेरबंद
लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी कर्जत पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली. कर्जत तालुक्यातील एका मोठ्या गावातील एका युवकाला या टोळीने सावज केले. 

7. ‘आठवडे बाजार बंदचे अधिकार प्रांताधिकारी व तहसीलदारांना’
 कोरोनाचा फैलाव वाढत असताना ग्रामीण भागातील गर्दी होत असलेल्या आठवडे बाजाराबाबत बंद करण्याचे सर्व अधिकार जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात येत आहेत. 

8. विद्यमान आमदारांनी रसिकांना नाट्यगृहापासून वंचित ठेवले
नाट्य रसिकांच्या आग्रहाखातर कोपरगावकरांसाठी आधुनिक बंदिस्त नाट्यगृह व्हावे म्हणून राज्याचे तत्कालिन नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून बंदिस्त नाट्यगृहासाठी निधी व जागा मिळावी म्हणून मागणी केली होती. 

९. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपोषणाला बसणार
कृषी कायदे कामगार कायदे यासारख्या जाचक कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलने सुरूच आहे आता याच मुद्यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपोषणाला बसणार आहेत , ते श्रीरामपूर येथे उपोषणाला बसणार आहेत.

10. जिल्हा न्यायालयाच्या कामकाज वेळेत बदल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर व संगमनेर येथील सत्र न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दिवसातून दोन सत्रांमध्ये कामकाज चालेल, असा आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी काढला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *