Breaking News

1/breakingnews/recent

26 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - देशभरात आणखी ५३,४७६ कोरोनाबाधितांची नोंद........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर संस्थेच्या अध्यक्षपदी   आ. नंदकुमार झावरे
अहमदनगर जिल्ह्यातील शंभर वर्षाची शैक्षणिक परंपरा जपलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार नंदकुमार झावरे यांची दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली 

2. देशभरात आणखी ५३,४७६ कोरोनाबाधितांची नोंद
गेल्या दोन दिवसांत देशातील करोनाबाधितांची संख्या १ लाखाने वाढली. गेल्या २४ तासांत ५३,४७६ नव्या बाधितांची नोंद झाली. या वर्षात आतापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ असून, देशातील बाधितांची एकूण संख्या एक कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

3. शुक्ला यांच्यावर कठोर कारवाई आवश्यक
गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारची जाणीवपूर्वक दिशाभूल के ली असून, गुप्त अहवाल उघड करणे हे अत्यंत गंभीर आहे. हा अहवाल त्यांनीच  फोडल्याचे उघड झाल्यास  त्या कठोर कारवाईस पात्र ठरतील, असा अहवाल मुख्य सचिव सीताराम कुं टे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सादर केला.

4. भारतातून करोना लशीची निर्यात स्थगित
देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर करोना लशींची देशातील मागणीच पुरवण्यावर भारत भर देणार असून; येत्या काही महिन्यांसाठी या लशींची निर्यात केली जाणार नाही, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी  सांगितले.

5. लष्कराचे मूल्यमापन निकष भेदभावजनक
अल्पकालीन नियुक्तीवरील महिला अधिकाऱ्यांच्या स्थायी नियुक्तीसाठी लष्कराने निश्चित केलेले मूल्यमापनाचे निकष भेदभावजनक आहेत.

6. इंधनाच्या दरांत सलग दुसऱ्या दिवशी कपात
तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कमी झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या दरांत गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी कपात करण्यात आली. त्यानुसार, पेट्रोलचे दर लिटरला २१ पैशांनी, तर डिझेलचे दर २० पैशांनी कमी करण्यात आल्याचे सरकारी किरकोळ इंधन विक्रेत्या कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

7. जळगावची पुनरावृत्ती धुळ्यात ?
सांगली, जळगाव महापालिकेत यशस्वी झालेला प्रयोग आता धुळे महापालिकेत राबवून भाजपला पायउतार करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. जळगाव महापालिकेत केवळ १५ सदस्य असताना शिवसेनेने भाजपच्या नाराजांना गळाला लावून सत्तांतर घडवून आणले. 

8. उसाला आग लागून महीला शेतकरी चे सात एकर ऊस जळून खाक
 औरंगाबाद वाळूज पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मेहंदीपुर  शिवारात आज शॉर्टसर्किटमुळे ऊसाला लागलेल्या आगीत सात एकर ऊस जळून खाक झाला आहे.

9. सर्वीस रिवॉल्वर ने छातीवर गोळी झाळुन आत्महत्या
अकोला येथील  हरीसाल वनपरीक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हान यांनी त्यांचे राहते शासकीय निवासस्थान हरीसाल येथे सर्वीस रिवॉल्वर ने छातीवर गोळी झाळुन आत्महत्या केली  मात्र हि आत्म हत्या का केली हे अद्याप स्पस्ट झालेले नाही पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

10. रामेश्वर मंदिर  घाटावर पाण्यात बुडून एकाच मृत्यू    
गंगापुर तालुक्यातील जुने कायगाव येथील रामेश्वर मंदिर परिसरातील घाटावर  विकास पवार हा तरुण आजीच्या रक्षा विसर्जनासाठी इतर नातेवाईका सोबत आला होता.सकाळी १०.३० वाजता रक्षा विसर्जन करताना येथील गोदापात्रात खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *