Breaking News

1/breakingnews/recent

25 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - बेटी बचाओ बेटी पढाओ शिल्पाला  मास्क लावून अनोखा संदेश...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. मोटार सायकल चोरी प्रकरणी टोळी गजाआड 
अकोल्यात मोटर सायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफ़ाश झालाय.. या टोळीतील तिघांना गजाआड करण्यात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.. या तिन्ही चोरटयांना जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. 

2. 27 गावातील पाणी प्रश्न घेऊन डोंबिवली मनसेची एमआयडीसीत धडक
गेल्या काही महिन्यापासून 27 गावात कमी दाबाने पाणी येत आहे.याकडे नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा एमआयडीसी कडून लक्ष दिले जात नाही.हीच बाब मनसे आमदार राजू पाटील यांना समजताच त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना इशारा देत कोरोनामुळे आधीच त्रासलेल्या नागरीकांना अजून किती समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

3. गेल्या दोन वर्षांपासून पाण्याच्या समस्येने नागरीक हवालदिल !
डोंबिवली परिसरातील नांदीवली टेकडी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पाण्याच्या समस्येने नागरीक हवालदिल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात इथे वस्त्या निर्माण झाल्या नगरसेवकांनी फक्त इथे टँकर ने पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे.

4. बेटी बचाओ बेटी पढाओ शिल्पाला  मास्क लावून अनोखा संदेश 
अकोल्यातील सुंदराबाई खंडेलवाल टॉवर चौकात 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या माय लेकीच्या शिल्पाला कुणी तरी अज्ञात व्यक्तीने मास्क लावलेत.जणू हा एक प्रतिकात्मक संदेश असावा.. माणसांनो आता तरी जागे व्हा..मास्कचा वापर करा असा  अनोख्या संदेशाच्या माध्यमातून  नागरिकांना आव्हान करण्यात आलाय.

5. जालना-घनसावंगी पं.स.चे लिपिक लाच घेतांना चतुर्भुज..
 जालन्यातील घनसावंगी मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केलीय...घनसावंगी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागातील लिपिक विजय मधुकर काळे यास एक हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेय.

6. सोलापूरकरांनो रेल्वेने कोठेही जा.. नो वेटिंग; कोरोनामुळे प्रवासी संख्येत घट
कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचा परिणाम आता रेल्वेच्या प्रवासावर दिसून येत आहे. सोलापूर विभागातून कोणत्याही मेल, एक्स्प्रेस, पॅसेजर गाडीने प्रवास करा.. तिकीट बुक होतेच... सीट बुकिंगसाठी वेटिंग करावे लागत नाही. 

7. राज्यातील महत्त्वाच्या बँकेसह या सरकारी बँकांचं लवकरच होणार खाजगीकरण
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी माहिती दिली आहे की, RBI कडून सार्वजनिक बँकांच्या खाजगीकरणासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. 

8. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, रामदास आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी
 रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. 

9. नव्या कार्यकारणीवरून राष्ट्रवादीत धुसफूस
राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर झालीये. मात्र या नियुक्त्यांमध्ये सावळागोंधळ असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यात कल्याण पश्चिमेला काहीसे झुकते माप देण्यात आल्याने डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

10. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला अर्जुन तेंडुलकर
मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याला आपल्या ताफ्यात घेतले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *