Breaking News

1/breakingnews/recent

25 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री अकोल्यात रोड रोलर चालवून सायलन्सरची लावली विल्हेवाट...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. प्राणी मित्रानेच ३ पाळीव कुत्र्यांना जाळुन स्वतः केली आत्महत्या
बदलापुर शहरातील एका ईमारतीत राहणा-या एका प्राणी मित्राने आपल्या तिन पाळीव कुत्र्यांना पेटवुन देवुन स्वतालाही जाळून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल रात्री बदलापुर शहरात घडली आहे. बदलापुर शहरातील(पश्चिम)विभागात रितु वर्ड नावाची ईमारत आहे.

२. कोथरूडमधील उद्यानात बोलणारी झाडे बसवण्याचा घाट
थकबाकी न भरल्याने पुणे पालिकेच्या कार्यालयांचा वीज पुरवठा महावितरणकडून तोडला जात आहे. तर, दुसऱ्या बाजूला पालिकेच्या विद्युत विभागाने कोथरूडमधील उद्यानात 88 लाख रुपये खर्च करून बोलणारी झाडे बसवण्याचा घाट घातला आहे. 

३. सिग्नलिंग यंत्रणेच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या गाड्या रद्द
मध्य रेल्वेनेदिलेल्या आदेशानुसार  लोणी रेल्वे स्थानकावर यांत्रिक सिग्नलिंग यंत्रणा काढून त्या ऐवजी इलेक्ट्राॅनिक सिग्नलिंग यंत्रणा बसविण्यात येणार आहे. 

४. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे - संजय राऊत
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. 

५. राज्यासह पुणे जिल्ह्यातील 45 वयापुढील नागरिक 'टार्गेट'
राज्य आणि जिल्ह्याने आता 45 वर्षे वयापुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी कंबर कसली असून, या चौथ्या टप्प्यात राज्यातील 2 कोटी 97 लाख लाभार्थींना लस दिली जाणार आहे.

6. आमलकी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले
आज आमलकी एकादशी असल्याने पंढरपूरच्या विठ्ठलाला पांढरे वस्त्र परिधान करण्यात आलं  असुन रुक्मिणी मातेला चॉकलेटी रंगाच्या सिल्कसाडीचा पोशाख केल्याने विठ्ठल रखुमाईचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.रांजणगावचे विठ्ठल भक्त नानासाहेब पाटील यांच्यावतीने ही सजावट करण्यात आली आहे.

७. संजय राऊतांच्या निवासस्थानी 'संगीत मैफिल
महाराष्ट्रात राजकीय नाट्याचा नवा कोलाहल सुरू असताना बुधवारी रात्री खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुरांची मैफल रंगली. 

८. महावितरणला सरकारकडून 390 कोटी रुपये मिळणार
महावितरणने 2020-21 या आर्थिक वर्षात औद्योगिक वीज ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज पुरवठा केला आहे. त्यानुसार महावितरणला राज्य सरकारकडून 390 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे थकीत वीज बिलामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरणला काहीसा दिलासा मिळणार आहे.

९. रियलमी 8 सिरीज मधील २ स्मार्टफोन लाँच
स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने  आज भारतात Realme 8 Series चे दोन स्मार्टफोन म्हणजेच  Realme 8 Pro आणि Realme 8 लॉन्च केले आहेत. 

१०. पुण्यातील शिवाजीनगर येथे 'सारथी'ला जागा देण्यास मान्यता
पुण्यातील शिवाजीनगर येथील जागा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला म्हणजेच सारथी ला  उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीय . पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील आगरकर रस्त्यावरील शालेय शिक्षण विभागाची 4 हजार 163 चौ.मी. इतकी जागा सारथीला देण्यात येणार आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *