Breaking News

1/breakingnews/recent

24 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - MPSC च्या विद्यार्थ्यांचा पुन्हा आक्रोश, रिडींग रूम सुरू ठेवण्याची मागणी...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. MPSC च्या विद्यार्थ्याचा पुन्हा आक्रोश, रिडींग रूम सुरू ठेवण्याची मागणी
 लातूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करत शाळा महाविद्यालय खाजगी कोचिंग क्लास व रिडींग रूम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

2. विरोधी धोरणामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच  आंदोलन
सिहोरा परिसरातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांच्या पुर्तेतेसाठी व जिल्हाधिकारी भंडारा, पणन विकास अधिकारी भंडारा, आमदार राजूभाऊ कारेमोरे, तहसीलदार तुमसर व पोलीस स्टेशन सिहोरा यांना दिलेल्या.

3. हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण...!!
थोर क्रांतिकारक  हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर  येथे आदरांजली वाहण्यात आली. 

4. अकोला ते अमनवाडी दरम्यान विद्युत पोलचे काम पूर्ण
अकोला ते अमनवाडी दरम्यान विद्युत पोलचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गावर आज विद्युत रेल्वेची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यामुळे अकोल्यातील रेल्वे मार्गाला चांगला वेग मिळणार आहे.

5. गैरहजर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश नाही!
ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांच्यावेळी सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुढील वर्गात प्रवेश मिळणार नसल्याचा निर्णय ईसा संघटनेने घेतला आहे. 

6. परभणी जिल्ह्यात संचार बंदी लागू
कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत असल्याने परभणी जिल्ह्यात सकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचार बंदी लागू करण्यात अली आहे. 

7. मी मंत्री असतो तर परमबीर सिंह यांचा तात्काळ राजीनामा घेतला असता
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले असून विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली जात आहे. 

8. लालबाग उड्डाणपूल आजपासून तीन महिने वाहतुकीसाठी बंद
मुंबई तील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मध्य मुंबईतील लालबाग आणि दक्षिण मुंबईतील भायखळा विभागाला जोडणारा महत्त्वाचा लालबाग उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून दररोज रात्री 11 ते सकाळी 6 यावेळेतवाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 

9. नेतेमंडळींच्या सातत्यानं होणाऱ्या बैठकांवर अनेकांच्या नजरा   
महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असल्याची चिन्हं आहेत. 

10. सोशल मीडियाच्या युगात मोदी विरुद्ध दिदी लढाई भिंतीचित्रावरही!
सोशल मीडियाच्या युगात प्रचाराच्या पद्धती कदाचित आधुनिक झाल्या असतील पण पश्चिम बंगालमध्ये आजही राजकीय पक्ष जुन्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *