Breaking News

1/breakingnews/recent

24 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - फोन टॅपिंग प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. अहवालात काही दम नसून त्याला काडीचीही किंमत नाही
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीमध्ये गृहसचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल सादर केला आहे. दरम्यान या भेटीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून फोन टॅपिंग अहवाल म्हणजे भिजलेला फटाका असल्याचा टोला लगावला आहे. 

2. शरद बोबडे यांनी केंद्राकडे केली शिफारस
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल लवकरच संपणार असून, नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

3. ‘आरटीपीसीआर’मध्ये वाढ
करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने पालघर जिल्ह्यला अतिरिक्त दीड हजार  आरटीपीसीआर चाचण्या करण्याची परवानगी दिल्याने आता जिल्ह्यतून दररोज दोन हजारांहून अधिक  चाचण्या  करणे शक्य होणार आहे. 

4. फोन टॅपिंग प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यपालांनी फोन टॅपिंग प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

5. पोलीसांची कारवाई, कंटेनरही घेतला ताब्यात
गोव्यातून पुण्याकडे होणार्‍या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी बांदा चेकपोस्टवर मोठी कारवाई केली. 

6. आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होणार
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, अशा परिस्थितीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

7. बदलीमुळे नाराज कारागृह अधीक्षकाची इच्छा मरणाची मागणी
पोलीस दलातील बदल्यांवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेले असतानाच आता सरकारच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. 

8. पश्‍चिम रिंगरोड 'फास्ट्रॅक'वर
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या केळवडे. ते उर्से  या 68 किलोमीटर लांबीच्या पश्‍चिम रिंगरोडला आता गती मिळणार आहे. या रिंगरोडसाठी दि.30 एप्रिलपर्यंत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहेत.

9. विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा आरोप
राज्य पोलीस दलात बदल्या आणि पदोन्नतीसाठी एक मोठे रॅकेट काम करत असल्याचा पर्दाफाश एका अहवालातून झाला आहे. 

10. नांदेड जिल्ह्यात 11 दिवसांचा लॉकडाऊन
आज मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन ही कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *