Breaking News

1/breakingnews/recent

24 मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री परमबीर सिंग यांच्या याचिकेवरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. उन्हाळी हंगामातील मुगाने भरगोस उत्पन्नाची हमी
मानवत येथील प्रयोगशिल शेतकरी नामदेवराव कोक्कर हे नेहमी आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करुन शेतात उत्पन्न घेतात. त्याच प्रमाणे त्यांनी आपल्या जमिनी पैकी दहा एकरमध्ये  दहा फेब्रुवारी 2021 ला  ऊन्हाळी मूगाची पेरणी केली. पेरणीसाठी कोक्कर यांनी खरीप मधील मूग वापरले. 

२. ४ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
अतिसंवेदनशिल समजल्या जाणा-या गडचिरोली जिल्हयात  एकुण 22 लाख रुपये बक्षीस असलेल्या  4 जहाल नक्षवाद्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल   यांच्या  समोर आत्मसमर्पण केले आहे.यामध्ये 3 पुरुष तर 1 महिलेचा समावेश आहे.  

३. बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन  
बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत बीडमध्ये लॉकडाऊन असेल. 

४. सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
आदर्श बँकेच्या जाधव सह चार जणांनी मारहाण करीन,तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत बॉण्ड आणि चेकवर सही घेऊन शेती बळकावल्याची सुसाईड नोट लिहून एका 34 वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील किन्होळा गावात घडली.

५. अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण  
 मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहेत. आमिर खान सध्या होम क्वारंटाईन असल्याची माहिती मिळत आहे.

६. पीएफमधील 5 लाखांपर्यंतची गुंतवणूक झाली करमुक्त
संसदेच्या खालच्या सभागृहात लोकसभेत  वित्त विधेयक २०२० मंजूर झाले आहे. यामध्ये केंद्र सरकारनेही काही संशोधन केले आहे. केंद्र सरकारने प्रॉव्हिडेंट फंडमध्ये  गुंतवणूक केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर केंद्र सरकारने कर सवलत मर्यादा  5 लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. 

७. टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितल्याने वाद
टीव्हीचा आवाज कमी करायला सांगितल्याने पिंपळे गुरव इथे  मंगळवारी वाद झाला. यातून दोन महिलांचा विनयभंग झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

८. परमबीर सिंग यांच्या याचिकेवरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा आली आहे. 

९. एनवी रमणा होणार देशाचे 48 वे सरन्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एनवी रमणा यांची   देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी कायदे मंत्रालयाला आपल्या उत्तराधिकाऱ्याचे नाव कळवले आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे हे पुढल्या महिन्यात निवृत्त होणार आहेत.

१०. प्राचार्य भरतीचा मार्ग मोकळा
राज्य सरकारने वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्‍त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. मंगळवारी नव्याने परिपत्रक प्रसिद्ध करीत 3 मे 2020 पर्यंत रिक्‍त असलेली प्राचार्यांची पदे भरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्राचार्यांची नियुक्‍तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *