Breaking News

1/breakingnews/recent

24 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - हरवलेला सतीश ‘मानवसेवा’ च्या उपचारानंतर कुटुंबात दाखल...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


1. हरवलेला सतीश ‘मानवसेवा’ च्या उपचारानंतर कुटुंबात दाखल 
मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य जपत अहमदनगरमधील मानवसेवा  प्रकल्पाच्या मायेच्या उपचाराने मानसिक विल्कलांग असलेल्या सतिशला त्याच कुटुंब मिळालय..रेल्वेच्या प्रवासादरम्यान सतीश हा आईवडिलांपासून अलग झाला होता.   

2. दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी कर्जत पोलिसांच्या ताब्यात 

दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराला  कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

 22 मार्च 2021 ला 02 वाजता फोनद्वारे कर्जत पोलिसांना माहिती मिळाली की, पाटेगाव आणि पाटेवाडी शिवारात काही इसम संशयास्पद रित्या आढळून आले आहेत. 


3. ऑनलाइन स्वाध्याय  योजनेत नगर जिल्हा राज्यात 18 व्या स्थानी
कोरोनाच्या  काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू  नये म्हणून राज्य शासनाच्या शालेय विभागाने तीन नोव्हेंबर २०२०  पासून पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअप च्या माध्यमातून स्वाध्याय उपक्रम सुरू केलाय. 

४. विषय समितीच्या निवडणूका बिनविरोध 
श्रीगोंदा नगरपालिकेच्या विषय समितीची निवडीमध्ये दोन्ही बाजूंनी बिनविरोधाचा  प्रस्ताव पार करत दोन समितीचे सभापती भाजपला तर दोन समितीचे सभापती काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीकडे देण्यात आलेत. श्रीगोंदा नगरपालिकेत विषय समिती सभापतींच्या निवडी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार डोळ्यात.

5. कॅशिअरनेच चोरले बँकेचे ४ लाख रुपये 
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत नोकरीला असलेल्या बँकेतील कॅशिअरने  चार लाखांची रोकड बँकेच्या तिजोरीत न ठेवता स्वतःच्या खिशात घालून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

6. कोरोना लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा फज्जा 
संगमनेर तालुकयातील घुलेवाडी येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे.  

७. लोकसहभागातून जलसंवर्धन झाल्यास गावे समृद्ध होतील 
जीवनात पाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. पाणी असेल तर ग्रामीण भागासह शहरी भागात समृद्धी  निर्माण होते. पाणी बचती हीच  पाणी निर्मिती असून जलसंवर्धन व संधारण होणे अत्यंत गरजेचे आहे. 

 8. बंडू बोराडे मित्र मंडळाची गांधीगिरी   

पाथर्डी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात बंडू बोराडे मित्र मंडळाने कार्यालयात स्वतःला बंद करत  गांधीगिरी केलीय. राष्ट्रीय महामार्गावर अनेकांचे बळी गेल्याने अनेक वेळा आंदोलने करून देखील कोणतेही काम करण्यात आलेली त्याचाच  निषेध करत त्यांनी हे कृत्य केलं आहे. या आंदोलन अनेकजण सहभागी झाले होते. 


9. अवकाळी पावसाने  घातला शेतकऱ्यांवर घाला 

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक गावात अचानक आलेल्या  अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे, हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालय. यामुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. 


10. नागरिकांना खाकीचा धाक नाही 
सध्या नेवासा तालुक्यात कोरोना चा संसर्ग वाढत असून सोनइ आणि  घोडेगाव येथे ७ आणि पाच असे संक्रमित रुग्ण आढळले आहेत.  दररोज सोनई घोडेगावमध्ये  कोरणा रुग्ण आढळत आहेत. मात्र जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलिस अधीक्षक आणि प्रशासनाकडून कडक आदेश असतानाही केवळ स्थानिक वाहतूक पोलिस मात्र बेकायदा प्रवासी वाहतूक वाहनांमध्ये विना मास्क  प्रवाशांवर कारवाई करीत नसल्याने स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.





No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *