Breaking News

1/breakingnews/recent

24 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

News24सह्याद्री - केंद्र सरकारची घोषणा; १ एप्रिलपासून मोहिमेचा तिसरा टप्पा........पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. आ. रमेशआप्पा कराड यांनी जेष्ठ कार्यकर्त्यां समवेत कोरोना प्रतिबंधात्मक घेतली लस
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी मंगळवारी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते भागवत सोट आणि दिलीप धोत्रे यांच्या समवेत घेतली.
        
2. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच पोलीस शहीद
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह््यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच पोलीस शहीद झाले, तर १४ जण जखमी झाले.

3. केंद्र सरकारची घोषणा : १ एप्रिलपासून मोहिमेचा तिसरा टप्पा
करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा १ एप्रिलपासून सुरू होत असून, त्यात ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली. 

4. बेदरकार टँकरचा धोका
शहरात टँकरची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. दिवसाला २०० ते ३०० टँकर दिवसभर रस्त्यावर फिरत असतात. पण बेदरकारपणे चालणारे हे टँकर वाहतूक आणि सुरक्षेचे सर्वच नियम धाब्यावर बसवत अपघातात वाढ होत आहे.  शहरात मागील पाच वर्षांत १५० टँकर अपघात झाले आहे. त्यामध्ये ५९ जणांचा मृत्यू झाला आहे.  

5. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रावरून मंगळवारी भाजपने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. ही विकास आघाडी नसून वसुली आघाडी असल्याची शेरेबाजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली.

6. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांचा युक्तिवाद
संसदेने १०३ वी घटनादुरुस्ती करून आर्थिक दुर्बल सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले असल्याने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली असून आता आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भात इंद्रा सहानी निकाल हा ‘लक्ष्मणरेषा’ मानता येणार नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी मंगळवारी केला.

7. मुख्यमंत्री अमरिंदर यांचा कठोर निर्बंधांचा इशारा
पंजाबमध्ये सरकारने जे ४०१ करोना रुग्णांचे नमुने सरकारकडे जनुकीय क्रमवारीसाठी पाठवले होते, त्यातील ८१ टक्के नमुन्यांत ब्रिटनचा विषाणू आढळून आला आहे. 

8. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण
मूळ पाकिस्तानी असलेला कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याला मुंबईतील २००८ मधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात भारताच्या ताब्यात देण्यास आमची हरकत नसल्याचे बायडेन प्रशासनाने लॉस एंजलिस येथील संघराज्य न्यायालयास सांगितले. 

9. देशात रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५०४ दिवसांवरून २०२ दिवसांवर
करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा भारतातील कालावधी काही भागातील दुसऱ्या लाटेमुळे  ५०४.४ दिवसांवरून २०२.४ दिवसांवर आला आहे. १ मार्चला हा कालावधी ५०४.४ दिवस होता तो आता २३ मार्चला तो २०२.४ दिवस झाला आहे.

10. बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या 14 दहशतवाद्यांना मृत्युदंड
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱया 14 दहशतावद्यांना बांगलादेशी कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. दहशतवाद्यांनी 2000 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची हत्या घडवण्याचा प्रयत्न केला होता.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *