Breaking News

1/breakingnews/recent

22 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - एक घास पक्षासाठी, सोहम फांऊडेशनचा अनोखा उपक्रम...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES

1. स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म करणार सुरु-  'ट्रम्प'   

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोशल मीडियावर परत येण्याची तयारी करत आहेत. ट्रम्प आता स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहेत, अशी माहिती ट्रम्प यांचे सल्लागार आणि प्रवक्ते जेसन मिलर यांनी दिली आहे.


2. देशमुखांना वाचवण्यासाठी पवारांकडे पुरावे
 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. 

3. एक घास पक्षासाठी,सोहम फांऊडेशन चा अनोखा उपक्रम
सोहम फाऊंडेशन च्या  सामाजिक संघटेनेच्या वतीने जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधुन काल उल्हासनगर कँम्प.नंबर तिन गोल मैदान येथील एका बगीच्यात एक घास पक्षासाठी हा सामाजिक उपक्रम गेल्या चार वर्षांपासून राबवित आहे.

4. शेतकऱ्यांनी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात खाल्ल्या भाकरी
अत्यल्प मिळालेला पीकविमा, विमा अधिकारी यांना तत्काळ काढा, नवीन विम्याची भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. 

5. खंडणीप्रकरणी देशमुखांची चौकशी करून गुन्हा दाखल करा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याचे चिन्हे दिसत आहेत.

6. भांडणे सोडविल्याचा रागामुळे जाळपोळ केल्याप्रकरणी  एकाला अटक

बहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे भांडण सोडवल्याचा राग आल्यामुळे एका व्यक्तीने दुचाकीतील पेट्रोल काढून फुटबॉल आणि क्रिकेटच्या मैदानावरील जाळी जाळून 3 लाखांचे नुकसान करण्यात आले आहे.


7. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत 7 पैकी 6 उमेदवारांनी विजय मिळवत विरोधी पॅनलच्या उमेदवारांना धूळ चारली. विरोधी पॅनलमधील फक्त कृष्णा डोणगावकर हे गंगापूर मतदारसंघातून विजयी झाले. 

8. नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन
जिल्ह्यात अंशता लॉकडाऊन करुनही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत नसल्याने अखेर जिल्ह्यात २५ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

9. केंद्र सरकारच बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट म्हणताच राऊत कडाडले
 तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारवर टाकलेल्या 'लेटर बॉम्ब'चे मोठे स्फोट होत आहेत. 

10. कृणाल पंड्याचे पदार्पण, तर मार्क वुडचे पुनरागमन
इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांनी कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पूर्ण केला आहे. यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मंगळवार पासून वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *