22 मार्च सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - कारवाई न करण्यासाठी ५० लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी २ कोटी..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे -शिवसेना नेते संजय राऊत
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही पुढे आली आहे.
2. देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक
देशात सध्या वाढती करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या संख्येत रुग्णवाढ नोंद होत आहे. दरम्यान सोमवारी देशात गेल्या २४ तासात ४६ हजार ९५१ रुग्णांची नोंद झाली आहे. ७ नोव्हेंबरनंतरची ही देशातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
3. शाही स्नानानंतर करोनाचा उद्रेक होण्याची भीती
उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर करोनाचं सावट गडद होताना दिसत आहे. राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.
4. कारवाई न करण्यासाठी 50 लाख तर नोकरीत परत घेण्यासाठी 2 कोटी
परमीबर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशात गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृह सचिवांकडे तक्रार केल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
5. एमपीएससी' चा दांडी पॅटर्न
अनेकदा लांबलेली महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा अखेर रविवारी संपुर्ण राज्यात पार पडली खरी, पण या परीक्षेला विद्यार्थ्यांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र संपुर्ण राज्यात होते.
6. जयसिंगपुरातील पायोस हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू
शहरातील डॉ. सतीश पाटील यांच्या पायोस हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, दुपारी कोल्हापूर येथील बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण तपासणी केल्यानंतर हा बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले.
7. कोल्हापुरात शिवसेना उपतालुकाप्रमुखावर हल्ला, 22 जणांवर गुन्हा दाखल
फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणावरून गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री नूर काले समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोरच शिवसेना उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे यांच्यावर डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली होती.
८. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.
घाटी रुग्णालयात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने घाटीला आवश्यक मनुष्यबळ, साहित्य तसेच इतर सर्व सोयी-सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, रुग्णसेवेसाठी घाटीला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
9. 'रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण न दिल्यास धान्य वितरण बंद करणार'
राजस्थान राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे. विमा संरक्षण न दिल्यास रास्त भाव रेशनिंग दुकानदार धान्य वितरण करणे बंद करतील, असा इशारा ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनच्या वतीने देण्यात आला आहे.
10. गोव्यात पालिका निवडणुकीत भाजपला यश, पण मुख्यमंत्र्यांचा उमेदवार हरला
गोव्यातील सहा नगरपालिका आणि पणजी महापालिका यासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार बहुतेक ठिकाणी जिंकले आहेत.
No comments
Post a Comment