Breaking News

1/breakingnews/recent

22 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - बापानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. पाथर्डी शहरात जोरदार गारांचा पाऊस
पाथर्डी शहरात तालुक्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. या गारांच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहेत.

२. बापानेच केला मुलीवर लैंगिक अत्याचार (तालुका पो.)
श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे 27 वर्षीय जन्मदात्या बापाने आपल्याच दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडलीय, शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता पोल्ट्री फार्मच्या ठिकाणी असलेल्या घरांमध्ये सर्व कुटुंब असताना 27 वर्षीय  बापाने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय. 

3. आ. मोनिका राजळेंनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
 पाथर्डी तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील अठरा ते वीस गावात अवकाळी पाऊस ,वादळी वारा आणि गारपिटीने शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

४. ग्रामीण रुग्णालयात उपचाराविना बेवारस महिलेची हेळसांड
सरकारी रुग्णालयाकडून अनेकदा रुग्णांकडे  दुर्लक्ष झाल्याचं चित्र आपण पाहिलं आहे. असाच एक प्रकार संगमनेरच्या ग्रामीण रुग्णलयात उघडकीस आलाय. 

५. अवकाळी पावसाने पिके भुईसपाट
राहता तालुक्यात गारांच्या पावसाने जोरदार हजेरी  लावलीय.तालुक्यातील शिर्डी,निमगाव,नांदुरकी यांसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झालाय.

६. बेनवडीमध्ये ग्रामस्वच्छता अभियान जोरात
 कर्जत तालुक्यातील बेनवडीमध्ये ग्रामस्थानी एकत्र येत स्वच्छते चा ध्यास घेत गावाला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा संकल्प सोडला आहे. सरपंच पोपटराव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली स्वछता अभियान राबवत गेले 21 दिवस श्रमदान करत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. 

७. स्विफ्टकार मधून आलेल्या चोरट्यांनी गुरुजींचे घर केल साफ
संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील कार्थळवाडी  परिसरात दरोडेखोरांनी एका शिक्षकाच्या घरावर दरोडा टाकलाय .दरोडेखोरांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून तीन लाख 21 हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय. 

8. निळवंडेप्रश्नी राजकारण नको :थोरात
निळवंडे प्रकल्पाबाबत आपण कधीही राजकारण केले नाही जे राजकारण करतात त्यांना महत्त्व देऊ नका हा पाण्याचा प्रश्न आहे असं प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलय. 

9. नगर जिल्ह्यात रविवारी ७६५ कोरोनाबाधित
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढलाय. एकाच दिवशी रविवारी 765 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

10. शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी
संगमनेर मधील शिवप्रभात सेवाभावी ट्रस्ट मांडवे बुद्रुक येथील गैरकारभाराची चौकशी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश बागुल यांनी अन्याय निवारण समिती कडे केलीय. या ट्रस्टमध्ये अतिक्रमण करण्यात आलं असून इथल्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील अजून देण्यात आलेला नाही.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *