22 मार्च Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - या सरकारने किती सचिन वाझें तयार केले भाजपचा सवाल.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. अकोल्यातील आळशी प्लॉट येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या विरोधात धरणे आंदोलन
अकोल्यातील आळशी प्लॉट येथील हुतात्मा चौक ते दक्षता नगर पर्यंत जाणाऱ्या जुन्या मिनी बायपास वरील उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरूआहे.परंतु हे काम बांधकाम नकाशाप्रमाणे झाले नाही.त्यामुळे येथील नागरिकांनी आक्षेप घेत हे काम थांबवण्याची मागणी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती यांना केली.
2. शहीद भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांच्या ९० व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन
निमा संघटनेच्या भारतभरातील जवळपास पंधराशे शाखांच्या माध्यमातून शहीद भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांच्या ९० व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
3. सभापती अंजली साळवे यांच्या कार्यालयात मनपा आयुक्तांची बैठक संपन्न..
काल विविध समस्या संर्दभात महानगरपालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांची सर्व विभागीय अधिका-या सोबत बैठक संपन्न झाली त्यात लवकरात लवकर समस्या सोडवण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी बैठकीत दिले.
4. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा टेमुर्डा मध्ये दरोडा
चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत धाडसी चोरीची घटना घडली आली आहे. काल बँक उघडण्याची वेळ झाल्यावर हा प्रकार पुढे आला.चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने बँकेच्या मागील बाजूची खिडकी कापली आणि बँकेत प्रवेश केला.
5. उल्हासनगरात समता सैनिक दलाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना...
भारतीय बौद्ध महासभा शाखा उल्हासनगर च्या वतीने महाड चवदार तळे क्रांतीसंगर दिनाचा 94व्या वर्धापन दिना निमित्त भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अंतर्गत समता सैनिक दल उल्हासनगर तालुका शाखेने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सुभाष टेकडी, उल्हासनगर 4 येथे महाड चवदार तळे क्रांतीसंगर दिनाच्या 94 व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मानवंदना देवुन वर्धापन दिन साजरा केला.
6. अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर काम सुरु !
कल्याण मलंग गड रोड वरील द्वारली गावाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. सततचे रस्त्यावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी सह परिसरातील नागरिकांना धुळीचे देखील त्रास होत होते.
7. डाव्यांच्या जाहीरनाम्यात गृहिणींना पेन्शनचा शब्द; ४० लाख युवकांना देणार रोजगार
डाव्या लोकशाही आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यात ४० लाख युवकांना रोजगार आणि गृहिणींना प्रतिमाह २५०० रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
8. यूपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे - खासदार संजय राऊत
जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष एकत्र असलेली विरोधी पक्षांची मजबूत आघाडी देशात निर्माण होण्यासाठी यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे मत शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
9. आज MPSC ची राज्य सेवा पूर्व परीक्षा, परीक्षा केंद्रावर 'ही' काळजी घ्या...
आज 21 मार्च रोजी महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
10. हिंदुस्थानचा मालिका विजय
टी-20 क्रिकेटमधील विजयी मालिका इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतरही कायम राहिली. कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्माची खणखणीत अर्धशतके भुवनेश्वरकुमार व शार्दूल ठाकूर यांची प्रभावी गोलंदाजी अन् हार्दिक पांडय़ाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला येथे झालेल्या अखेरच्या लढतीत 36 धावांनी धूळ चारली आणि पाच सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने खिशात घातली.
No comments
Post a Comment