News24सह्याद्री - परमबीर सिंगची बदली केली याची चौकशी का केली नाही?...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. परमबीर सिंगची बदली का केली, चौकशी का केली नाही?
“परमबीर सिंग यांना पदावरून का बदलण्यात आलं. त्यात ते गुंतलेले होते का? त्यांची बदली का केली, चौकशी का केली नाही?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला आहे.
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार?
राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या, असे देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते.
3. पोलिसांना १०० कोटी, तर मग मुंबई महापालिकेला किती टार्गेट असेल?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा केला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बवरुन ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.
5. सचिन वाझेंचा मुक्काम 'वर्षा'वर होता, नारायण राणेंचा गौप्यस्फोट!
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बप्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे.
6. ग्राम सुरक्षा दलाच्या गस्तीमुळे चोऱ्यांना आळा
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनशी संलग्न ग्राम सुरक्षा दल समितीकडून रोज रात्री नियमितपणे गस्त घातली जात आहे. त्यामुळे तळेगावमध्ये रात्रीच्या वेळी होणाऱ्या चो-या तसेच विनाकारण दुचाकीवरुन गोंगाट करत फिरणाऱ्यांवर आळा बसला आहे.
7. महाविकास आघाडी सरकारच्या विरुध्य अकोल्यात निदर्शने
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी आयुक्त व पोलिस अधिकारी परमवीर सिंग यांनी गंभीर आरोप केलाय.
8. गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
बळसाणेसह माळमाथ्याच्या काही भागात सोसाट्याचा वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन शनिवार रोजी दुपारी साधारणतः पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान गारपीटासह अवकाळी पावसाची सुरुवात आगरपाडा शिवारात झाली.
9. खासगी रुग्णालयांत लसीकरणाचा वेग कमी
कोरोनाची धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहिम देशभर सुरू आहे. मात्र यात बातमी अशी आहे की खासगी रुग्णालये लसीकरण मोहिमेबाबत जास्त उत्साह दाखवत नाहीयेत.
10. नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद विकोपाला
ग्रामपंचायत निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील ही घटना आहे.
No comments
Post a Comment