21 मार्च सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - चित्रा वाघ म्हणतात आता मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत देशात रिमोट वोटिंग सुरू होणार
आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे 2024पर्यंत देशातील नागरिकांना रिमोट वोटिंगचा लाभ घेता येणार आहे. लोकसभा निवडणुकीत रिमोट वोटिंग सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
2. मेट्रोच्या सेवेत उद्यापासून हाेणार आणखी वाढ
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या सेवेत सोमवारपासून आणखी वाढ केली जाईल. मुंबई मेट्रो वनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार २२ मार्चपासून मेट्रोच्या दरराेजच्या फेऱ्या २८० केल्या जातील.
3. 'आबा आज तुमची आठवण येतेय, राज्याला आपणच पाहिजे होता'
माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. द
4. सरकारमधील प्रत्येकानं आपले पाय जमिनीवर आहेत का पाहावं
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावाने लिहिण्यात आलेल्या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
5. गृहमंत्री अनिल देशमुखांवर टांगती तलवार; जयंत पाटील म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं,
6. चित्रा वाघ म्हणतात आता मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवावं
| राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी वाझेंना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक दावा सिंग यांनी केला आहे.
7. अनिल देशमुख राजीनामा द्या-देवेंद्र फडणवीस
एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
8. आश्वासनपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे "टेक ऑफ' बदलण्याचा घाट
खोट्या माहितीद्वारे राजुरी, नायगाव, रिसे, पिसे, पांडेश्वर, मावडी-पिंपरी परिसरात लोकप्रतिनिधी विमानतळ लादू पाहत असल्याचा आरोप विमानतळ विरोधी संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी पत्रक काढून केला आहे.
9. कोरोना लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा - मुख्यमंत्री
लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा.
10. निर्णायक सामना जिंकताच विराटचे सर्वप्रथम रोहितला आलिंगन
शनिवारी भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे टी२० मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना पार पडला. हा निर्णायक सामना ३६ धावांनी जिंकत यजमानांनी ३-२ ने मालिका खिशात घातली.
No comments
Post a Comment