21 मार्च सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - मुकेश अंबानींच्या संपत्तीत एका दिवसांत 22 हजार कोटींची भर...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. आनंदी देशांमध्ये भारत १३९ व्या क्रमांकावर
२०२१ चा जागतिक आनंद निर्देशांक अहवाल जाहीर करण्यात आला असून फिनलंडने लागोपाठ चौथ्या वर्षी पहिला क्रमांक मिळवला आहे.
2. क्रिडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ग्रेस गुण त्वरित देण्याची मागणी
कोरोना विषाणूचा फटका होतकरू खेळाडूंना बसता कामा नये, विद्यार्थ्यांचे व त्यांच्या प्रतिभेचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ग्रेस गुण सवलत त्वरित देण्यात यावेत, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या व्यथा जिल्हा भाजपाकडे मांडल्या आहेत.
३. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोरोना पॉझिटिव्ह
देशात कोरोनाची दुसरी मोठी लाट सुरु झाली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.त्यांचा कोरोना रिपोर्ट 19 मार्चला पॉझिटिव्ह आला असून 30 मार्चला त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालय़ात दाखल करण्यात आले आहे.
४. भुवीच्या गुगलीवर इंग्लंडचा फलंदाज 'बोल्ड'
इंग्लंड विरुद्ध टी 20 मालिकेत 3-1नं मालिका जिंकण्यात भारतीय संघाला मोठं यश आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भागीदारी फलंदाजीनं मैदानात तुफान आणलं तर भारतीय संघातील गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणलं.
५. मुकेश अंबानींच्या संपत्तीत एका दिवसांत 22 हजार कोटींची भर
बाजारात आलेल्या तेजीमुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीत एका दिवसात 3.03 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 22 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
६. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत एससी व एसटी विद्यार्थ्यांना फ्री-शीप
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये फ्री-शीप आणि स्कॉलरशीप देण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
७. कांद्याने केला शेतकऱ्याचा पुन्हा वांधा
देशातील किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे दर 25 रुपये प्रती किलोपर्यंत आले आहेत. महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.रब्बी हंगामातील कांदा बाजारपेठेत आल्यानं कांद्याचे दर कमी झाले आहेत.
8. भगीरथ भालके समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची धुलाई
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भालके समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
९. चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली
मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत आता संपल्याने महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुदत संपण्यापूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक होऊन सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करणे
१०. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणा: आठवले
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.महाराष्ट्राच्या गृह विभागावर कलंक लागला गेला आहे.
No comments
Post a Comment