21 मार्च सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - मनसुख हिरेन हत्या कटात सचिन वाझे सूत्रधार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
१. बीजेपीच्या वतीने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
परमबीर सिंग यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होत. त्यामध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची टर्गेट दिलं होत अशी माहिती या पत्रात नमूद केली होती.
२. मनसुख हिरेन हत्या कटात सचिन वाझे सूत्रधार
मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात 11 जण सहभागी होते, अशी धक्कादायक माहिती ठाणे दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली आहे.
३. देशातील नागरिकांचे प्रथम लसीकरण करा - बाबर
केंद्र सरकारने देशातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण कराव आणि लस सर्वप्रथम देशातील नागरिकांना देऊन इतर लस बाकीच्या देशांना विकाव्यात. अथवा, मदत म्हणून द्याव्यात.
४. वणवा लावणाऱ्या मुख्याध्यापकासह शिक्षिकेला 5 हजार रुपये दंड
वाई तालुक्यातील रेणावळे परिसरात वणवा लावल्याप्रकरणी दोषी धरून वाई न्यायालयाने रेणावळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 20 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
५. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद
चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मालाची खरेदी करणारे चार ते पाच व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, कोरोना विषाणूची मार्केट यार्डात रुग्ण संख्या वाढत असल्याने भुसार मालाचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
६. सांगली जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न
जनतेच्या सुरक्षेप्रति काम करणाऱया पोलिसांना साधनसुविधांची आवश्यकता असते. ती पूर्ण करण्यासाठी आणि जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलय.
७. संजय राऊतांचं मोठं विधान
राज्यातील विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कितीही आरोप केले तरी सरकराच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत.
८. पुण्यात २ हजार ९०० कोरोनाबाधितांची नोंद
काल दिवसभरात पुणे शहरात २ हजार ९०० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. काल अखेर शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ३५ हजार ३९४ झाली आहे.
९. बॉलिवूडमधील तारा निखळला
'कभी कभी', 'चांदनी' 'सिलसिला' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिणारे लेखक, दिग्दर्शक सागर सरहदी यांचं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते.
१०. खा.आदिती तटकरेंचे बॅनर हटवले
पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाला जोरदार सुरुंग लागला असून गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे. खारघर शहर अध्यक्ष पदावरुन सुरू झालेला वादंग आता पनवेलमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचला आहे.
Tags:
No comments
Post a Comment