21 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - घोड नदीपात्र छापा 37 लाखांचा मुद्देमाल जप्त...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना दहीगावने येथे श्रद्धांजली
भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत गांधी साहेब अमर रहे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.
2. ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू
पाथर्डी शहरातुन जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टनम या राष्ट्रीय महामार्गवरील कोरडगाव रोड चौक वर ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.
3. राज्यात आज mpsc परीक्षा
सलग पाच वेळा रद्द झालेली mpsc परीक्षा आज राज्यात होत आहे.नगरसह राज्यात ही परीक्षा होत असून.तहसीलदार, पोलीस निरीक्षक,उप निरीक्षक आदी पदा साठी ही परीक्षा घेतली जात आहे.
4. नाना पटोले यांच्याशी मतभेद नाही
नाना पटोले हे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बैठका या सुरू असतात त्यात मत-मतांतरे असतात याचा अर्थ आमच्यात मतभेद आहेत असं होत नाही.
5. चोरट्यांनी बंद घर फोडून 39 हजार रुपयांचे दागिने चोरले
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील चोरट्यांनी बंद घर फोडून 39 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. एकोणावीस मार्च रोजी ही घटना घडली.
6. जिल्ह्यात गारपीट वादळाचा पिकांना तडाखा
पाथर्डी, शेवगाव, नेवासा, राहुरी, कोपरगाव, नगर तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळ आणि गारपिट पावसाने रब्बी हंगामातील गहू हरभरा कांदा फळबागांचे प्रचंड नुकसान केले आहे.
7. ८० हजार किमतीचे ठिबक आगीत जळून खाक
शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे वीज पडून शेतकरी मच्छिंद्र विश्वनाथ थोरात यांच्या शेतातील गट नं.७२ मधील २ एकर उसाचे क्षेत्र व ८० हजार किमतीचे ठिबक आगीत जळून खाक झाले.
8. गोदावरी नदीतील पाणी शेवाळाने सुटली दुर्गंधी
शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीत संपूर्ण कोपरगाव शहराचे मैलामिश्रित सांडपाणी अनेक वर्षापासून सोडले जात आहे. सध्यास्थितीत नदीतील पाणी ही पूर्णतः शेवाळलेले असून या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे.
9. औषध घोटाळा चौकशी करा
शिर्डी साई संस्थानच्या रुग्णालयातील औषध घोटाळ्याची सखोल चौकशी करावी. हॉस्पिटलमधील प्रभारी राज संपादन रुग्णालयातील बेबंदशाही ला लगाम घालावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
10. घोडा नदीपात्र छापा 37 लाखांचा मुद्देमाल जप्त
श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे गावाच्या शिवारातील घोड नदी पात्रात बेलवंडी पोलिसांनी छापा टाकून 37 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत बापू मारुती गोरडे, बाबुराव नगर, दीपक कमलेश, श्रीकांत शेंडगे, तसेच पाच ते सहा अनोळखी कामगार यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment