19 मार्च सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - रोहित पवार भेटीसाठी प्रवीण दरेकरांच्या निवासस्थानी...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. 'त्या' दिवसांपर्यंत सचिन वाझे सतत मनसुख हिरण यांच्याशी संपर्कात
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कार्पिओ आढळल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास NIA आणि ATS करत होती. त्यावेळी सचिन वाझे हे मृत मनसुख हिरणच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती त्यांच्या सीडीआरमधून उघडकीस आली आहे.
2. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता
राज्यात आजपासून चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर, भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धा जिल्ह्यात आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3. रोहित पवार भेटीसाठी प्रवीण दरेकरांच्या निवासस्थानी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. रोहित पवार चक्क प्रवीण दरेकर यांना भेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
4. किसानपुत्रांचं आज अन्नत्याग आंदोलन
आज 19 मार्च रोजी महाराष्ट्रातील शेतकरी व किसानपुत्र हे आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
5. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुलाबराव पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
6. बावनकुळेंचा आंदोलनाचा इशारा
मराठा आरक्षणामुळे आधीच कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारला आता ओबीसींच्या रोषाचाही सामना करावा लागणार आहे. ओबीसींचा डाटा देत नाही तोपर्यंत ओबीसींचं आरक्षण राहणार नाही. त्यामुळे ओबीसींना निवडणूक लढवण्यात अडचणी येणार आहेत.
7. मुंबईत दादरचं भाजी मार्केट आणि फूल बाजार स्थलांतरावरून वाद
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यात दादर भाजी आणि फूल मार्केट मधील रोजची होणारी गर्दी पाहता दादर भाजी फूल मार्केट सोमया आणि बीकेसी मैदानात हलवण्यात येणार असल्याचे महापौर यांनी बीएमसीकडून केला जात असल्याच सांगितलं.
8. आंदोलक शेतकऱ्यांनाही कोरोना लसीचे डोस द्या: राकेश टिपैत
केंद्राचे अन्याय कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली सीमेवर धरणे धरलेल्या शेतकऱ्यांनाही कोरोना प्रतिबंधक लस द्या, अशी मागणी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिपैत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
9. मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांवर अॅंटिजन चाचण्या होणार
कोरोनाच्या उद्रेकाला रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य आहे.
10. मराठवाड्यातील लातूर, नांदेड जिल्ह्यात विशेष खबरदारी
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टोरेंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
No comments
Post a Comment