19 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - हजार रुपयांची लाच घेताना डमी तलाठ्याला पकडलं....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. बालमटाकळी ते शिर्डी साई बाबा पालखी सोहळा रवाना..
शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र बालमटाकळी येथील ओमसाई ग्रुप आयोजित बालमटाकळी ते शिर्डी साई बाबा पायी पालखी सोहळा या वर्षी मोठ्या उस्साहत पार पडला.
2. आरोपी गजाआड खुनाच कारण अद्याप अस्पष्ट
राहुरी तालुक्यातील बारागांव नांदूर येथील अर्जून पवार या तरूणाचा दि. १६ मार्च रोजी प्रेम प्रकरणातून निर्घृण खूण करण्यात आला. लोणी पोलिसांनी या घटनेतील दोन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले.
3. श्रीरामपूर शहरात सोन्याच्या गंठण हा सह अज्ञात चोरट्याने कडून 21000 लंपास
श्रीरामपूर शहरातील प्रभाग 7 परिसरातील सुभाष कॉलनीतील श्याम निवास येथे अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरी केली.
4. हजार रुपयांची लाच घेताना डमी तलाठ्याला पकडलं
कर्जत तालुक्यातील कोकणगाव घुमरी तलाठी कार्यालयातील खाजगी कर्मचाऱ्याला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.. सचिन सुरेश क्षिरसागर असा आरोपीचे नाव असून गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.
5. सिगारेट विक्रेत्यांचे एक लाख लुटले
श्रीरामपूर पुणतांबा रस्त्यावर खैरी निमगाव शिवारात एका सिगारेट विक्रेत्यांची अज्ञात चोरट्यांनी 50 हजार रुपयांची रक्कम आणि मुद्देमाल चोरला.
6. शिर्डी करांना थकबाकी वसुलीसाठी शॉक
आर्थिक अडचणीत असलेल्या साई नगरातील वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने कनेक्शन कट च्या माध्यमातून शॉक ट्रीटमेंट सुरू केली आहे. नऊ हजार ग्राहकांपैकी जवळपास साडेपाचशे हून अधिक ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात आले आहे.
7. शेतातील पाईपलाईन चे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा
शेतातील पाईपलाईन चे नुकसान केले शेततळ्यातील पेपर काढून का नेले, असं विचारला असता पाच जणांनी मिळून एकास शिवीगाळ दमदाटी केली.
8. पंचायत समिती फर्निचर साठी निधी द्यावा; आमदार काळे
कोपरगाव पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीचे विस्तारीकरणाची काम अंतिम टप्प्यात आले आहे. या इमारतीच्या फर्निचर साठी निधी द्यावा अशी मागणी आमदार आशितोष काळे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.
9. कोरोनाचा चे नियम पाळा अन्यथा कारवाई देवदत्त केकाण
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून जिल्ह्यात लक्षणीय आणि चिंताजनक परिस्थिती आहे व्यापारी कामगार ग्राहकांनी मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करून सामाजिक अंतर पाळत कोरोना बाबतची सर्व नियम पाळावेत.
10. कर्जतला लवकरच एमआयडीसी
कर्जत तालुक्यातील आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे एम आय डी सी होणार असून तीन ठिकाणी जागेची पाहणी करण्यात आली आहे लवकरच आमदार पवार एमआयडीसीची घोषणा करणार आहे.
No comments
Post a Comment