Breaking News

1/breakingnews/recent

19 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

       News24सह्याद्री -  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही: चंद्रकांत पाटील...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEALINES


1.केंद्राचा केजरीवाल सरकारला झटका 
केंद्रातील मोदी सरकारनं दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका दिला आहे. दिल्ली आम आदमी सरकारकडून 'मुख्यमंत्री - प्रत्येक घरात रेशन' ही योजना सुरू करण्यात येणार होती.

2.कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे कर्नाटक सरकार चिंतेत आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून उस्मानाबादच्या उमरगा तालुक्याजवळील कलबुर्गी मार्गावरील खजुरी आणि हैदराबाद मार्गावरील तलमोड सिमेवर नाकाबंदी सुरू केली होती. 

3.मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू -महापौर किशोरी पेडणेकर
महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेअनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत

4. शिमगोत्सवाची तयारी, मुंबईतून कोकणात दररोज 40 गाड्या सोडणार
कोकणातला मुख्य सण म्हणजे शिमगोत्सव मुंबईकर चाकरमान्यांसाठी शिमगोत्सव हा मानाचा उत्सव मानला जातो. या होळी सणासाठी 26 मार्चपासून दररोज 40 बस मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात सोडण्यात येणार आहेत.

5. पाणीटंचाईपासून बदलापूरकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात होणार वाढ
पाणीटंचाईच्या समस्यांना अंबरनाथ ,बदलापूरकरांना नेहमीच सामोरे जावे लागत असून नागरिक यांमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. परंतू आता त्यांच्या समस्या काहीशा कमी होण्याची शक्यता आहे.

6. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर
 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत'. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही.

7. इयत्ता दहावी, बारावीचा अभ्यासक्रम 50 टक्क्यांनी कमी करा
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 

8. एमएमपीएसीच्या विद्यार्थ्यांना पीपीई कीट घालून द्यावी लागणार परीक्षा
राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या परीक्षा पुढे ढकल्या आहेत. येत्या २१ मार्चला ही परीक्षा घेण्यात येणर आहे. १४ मार्च २०२१ रोजी लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० घेण्यात येणार होती.

9. अमरावतीतील तिवसा गावात सापडली स्फोटके, तिघांना अटक
अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात 200 जिलेटीनच्या कांड्या व 200 डिटोनेटर सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिवसा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून स्फोटके बाळगण्याचे नेमके कारण काय याचा तपास ठाणेदार रिता उईके यांनी सुरु केला आहे. 

10. बाबर आझमच्या अडचणीत वाढ

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या मागील वादांचे शुक्लकाष्ठ काही संपायचे नाव घेत नाहिये. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कोविड-१९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तो दोनच दिवसांपूर्वी वादात अडकला होता. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *