18 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक
कोपरगाव शहरासह तालुक्यात १६ मार्च रोजी सापडलेल्या २३ करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात ७ तर खासगी लॅब मधील ७४ तर नगर येथे पाठवलेल्या अहवालांपैकी ३६ असे ऐकून ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
2. टँकर-दुचाकी अपघातात दोन ठार
बेनवडी फाटा शिवारात टँकर आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार झाले आहे. ही दुर्घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.
3. सहा लाख चाळीस हजार रुपये चा मुद्देमाल अज्ञात चोरांनी केला लंपास
जामखेड तालुक्यातील पाटोदा ( गरडाचे ) येथील मोरे वस्ती वर राहाणारे परशुराम नागोराव मोरे यांच्या घराच्या जिण्याच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून परशुराम व त्यांची पत्नी यांना जबर मारहाण करून कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये रोख व चार लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख चाळीस हजार रुपये चा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला आहे.
4. रस्ता रुंदीकरणात माझा बळी जाणार, मला वाचवा!
श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कामालाही सुरुवात होणार आहे.
५. घोड प्रकल्पाचे आवर्तन २७ मार्चपासून सुटणार : पाचपुते
शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. पाणी लवकर साेडण्याची घोड प्रकल्पाखालील शेतकऱ्यांची मागणी होती.
6. ६५ स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसह व स्वच्छतेचे संदेश देणारी रंगरंगोटी सुरू
श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरुस्ती व रंगरंगोटी सुरू केली आहे. त्यामुळे जुनाट व पडझड झालेली स्वच्छतागृहे आता कात टाकून पुन्हा एकदा जनसेवेला सज्ज झाले आहेत.
7. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेत केली पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय
टाकाऊ वस्तुपासून ल. ना. होशिंग विद्यालयातील शिक्षक मुकुंद राऊत व बबनराव राठोड यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी शाळेत धान्य, पाण्याची सोय केली.
8. रस्ते, आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन गरिबांना योजनांचा लाभ देणार : अभंग
कुकाणा गावचा विकास नियोजन बद्ध पद्धतीने केला जाणार असून पारदर्शक कामांतून रस्ते, आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत गोरगरिबांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभही संबंधित कुटुंबीयांपर्यंत पोहचवणार अाहे.
9. फुले कृषी विद्यापीठाचे सोयाबीन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे विकसित केलेले केडीएस-९९२ हे सोयाबीन पिकाचे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले. दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा व आंध्रप्रदेश या पाच राज्यांत या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
10. माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन, नगरमध्ये आज अंत्यसंस्कार
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप मनसुखलाल गांधी यांचे बुधवारी पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
No comments
Post a Comment