Breaking News

1/breakingnews/recent

16 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

No comments

       News24सह्याद्री -  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही: चंद्रकांत पाटील...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES


1. रेल्वेचं खासगीकरण कधीच होणार नाही
रेल्वेचं कधीच खासगीकरण होणार नाही, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. रेल्वेही भारताची संपत्ती आहे.

2. 'सिडकोचं काम आता संपलं, त्यांनी नवी मुंबईतून निघून जावं'
भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी आज पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेत हजेरी लावली. महापालिका आयुक्तांची भेट घेत नाईक यांनी कामाचा आढावा घेतला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी सिडकोच्या कामकाजावर जोरदार टीका केली.

3. विधानसभेत छातीठोक सांगितलं, पण प्रत्यक्षात शार्जिलबाबत काय केलं?
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विधानसभेत छातीठोकपणे सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शार्जिल उस्मानी  येऊन गेला तरी काही करु शकले नाहीत.

4. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही : चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षणाच्या बाबतीत या सरकारमधील कोणाचाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही. या नेत्यांना मराठा समाजातील गरीब वर्ग पुढे येऊ द्यायचा नाही.

5. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे सोपे नाही
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी विरोधकांकडून अनेकदा मागणी होताना दिसते. पण, यावर आता राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

6. 'राज्याच्या कामात केंद्राची विनाकारण ढवळाढवळ'
मुंबईत मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. यावर सरकारमधील तिन्ही पक्षांतून यावर वेगवेगळी मते व्यक्त होत आहे. 

7. निवडणूक आयोग आणि अमित शाहंवर ममता बॅनर्जींचा निशाणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. बांकुडा येथील निवडणूक प्रचारसभेत त्यांनी काही लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग अमित शाह चालवत आहेत.

8. जळगावात गेल्या पाच दिवसात पाच हजार रुग्णांची नोंद
जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात पाच हजारच्या जवळपास कोरोना चे रुग्ण आढळून आले आहेत. तर यामध्ये 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा कहर काही केल्या.

9. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोनाचा पॉझिटिव्ह
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यात रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. 

10. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा लग्नकार्यातूनही निषेध
 पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचा वाहनचालकांना मोठा फटका बसला. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात नवरदेव आणि वऱ्हाडी चक्क बैलगाडीने लग्नस्थळी पोहोचले. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *