पुणे विद्यापीठाचे 144 कोटी 62 लाख 88 हजार सरकारकडे 'थकित'; वेतनावरील भार वाढला
मुंबई -
पुणे विद्यापीठाचे पैसे सरकार थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी महाराष्ट्र शासनाकडून 144 कोटी 62 लाख 88 हजार रुपये इतकी रक्कम येणे बाकी असल्याची माहिती पुढे आली आहे. या थकित रकमेमुळे विद्यापीठाच्या वेतनावरील भार वाढत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यापीठाची येत्या शनिवार अधिसभा होत आहे. थकित वेतनासंदर्भात अधिसभा सदस्य डॉ. कान्हू गिरमकर यांनी प्रश्न विचारला असता, त्यांना ही माहिती देण्यात आली. त्यास उत्तर देताना डॉ. मनोहर चासकर यांनी दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुणे विद्यापीठाला राज्य शासनाकडून 144 कोटी रुपये येणे बाकी असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाकडून तपशीलवार माहिती अधिसभेत सादर आवश्यक असल्याचे डॉ. गिरमकर यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे डॉ. गिरमकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी विद्यापीठ फंडातून किती रक्कम खर्च केली जात आहे आणि आतापर्यंत किती खर्च झाला आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यास विद्यापीठ प्रशासनने गेल्या दोन वर्षातील विद्यापीठ फंडातून किती खर्च झाला आहे, याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. तसेच विद्यापीठाच्या इंडोमेंट फंडात 63 कोटी 90 लाख 45 हजार इतकी रक्कम शिल्ल्क आहे. तसेच विद्यापीठ कायम ठेव म्हणून 63 कोटी 74 लाख 26 हजार इतकी रक्कम असल्याचे विद्यापीठाने नमूद केले आहे. सन 2029-20 या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ फंडातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी अनुक्रमे 17 कोटी 79 लाख,50 हजार तर 20 कोटी 74 लाख 48 हजार इतका खर्च झाला आहे. तर 2020-21 या वर्षात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी अनुक्रमे 16 कोटी 78 लाख, 60 हजार, तर 23 कोटी 35 लाख 35 हजार रुपये इतकी रक्कम खर्च झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात विद्यापीठ फंडातून वेतनापोटी 78 कोटी 67 लाख 94 हजार 726 रुपये खर्च झाला आहे.
No comments
Post a Comment