Breaking News

1/breakingnews/recent

1८ मार्च सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री अमिताभ बच्चनची नात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. गरजूंना मदतीचा हात देताना कोरोनाने गाठलं
कोरोनाकाळात गरजूंना हात देणाऱ्या नगरसेवकाचा कोरोनामुळेच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचे कोरोनामुळे निधन झाले. 

2. आधी पाच लाख जमा करा तरच याचिकेवर सुनावणी
कोविड काळात पालिकेने औषधांसाठी तसेच जंतुनाशकांसाठी वाढीव दराने निविदा मागवल्या असून यात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेणाऱ्या भाजप आमदार आशीष शेलार यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर घेतले. 

3. अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस पूर्णपणे सुरक्षित; WHO ची शिफारस
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी बुधवारी जगभरातील देशांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका  लस वापरणे सुरू ठेवण्याची शिफारस केली. 

4. महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता
अँटिलिया जवळ स्फोटकं सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तकडाफडकी बदली देखील करण्यात आली आहे. 

5. अमिताभ बच्चनची नात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली
उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलाच्या कपड्यांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.रिप्‍ड जीन्स संदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 

6. 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या
दंगल गर्ल गीता फोगट आणि बबीता फोगाटची मामेबहीण असलेल्या रितिका फोगाटने आत्महत्या केली आहे. राज्यस्तरीय कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने झालेला पराभव सहन करता न आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

7. देवेंद्र फडणवीसांची काल नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्यासोबत भेट
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशीरा पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. 

8. गेट परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर
फेब्रुवारी महिन्यामध्ये 5,6,7,12,13 आणि 14 तारखेला GATE 2021 परीक्षा पार पडली. इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईकडून ही परीक्षा घेण्यात आली. GATE 2021 परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर झाली आहे. 

9. पालकमंत्री भरणे यांच्या कार्यपद्धती वरून काँग्रेसमध्ये संताप
लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव कशामुळे झाला अशी विचारणा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी करताच सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते निरुत्तर झाले. 

10. Aadhar Card लिंक नसल्याने तीन कोटी रेशन कार्ड रद्द प्रकरण
रेशन कार्ड केवळ आधार कार्डशी लिंक नसल्याचं कारण सांगून केंद्र सरकारने देशातील जवळपास तीन कोटी रेशन कार्ड रद्द केली आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *