27 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री - मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
5. इंग्लंडला मोठा धक्का
पाहुण्या इंग्लंड संघाला तिसऱ्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागलाय.. अहमदाबाद कसोटीत टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे इंग्लंडचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून पत्ता कट झाला. त्यात त्यांना शनिवारी आणखी एक झटका बसला.
6. आर्थिक सेवा या विषयावर मोदींचे वेबिनार
करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना बँकांनी उद्योगांची कर्जाची गरज भागवावी, तसेच नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. खासगी क्षेत्राला पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व बँकिंग व विमा क्षेत्रात गरिबांसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
7. क्रिकेट स्पर्धेसाठी चक्क मेंढा, बोकड, कोंबडय़ांची बक्षिसे
वाळवा तालुक्यातील एका मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी चक्क मेंढा, बोकड, देशी कोंबडय़ा, अंडी अशा बक्षिसांची घोषणा केली आहे. वाळवा तालुक्यातील बोरगावच्या साथीदार ग्रुपच्या वतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आलं आहे.
8. अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अंबानींच्या अँटालिया बंगल्याबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मोर आली आहे.
9. चित्रा वाघ अडचणीत
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.
10. कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर
पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच पिफ पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन 11 मार्चला होणार आहे. पिफ चित्रपट महोत्सव 11 ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे.
No comments
Post a Comment