27 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - ऊसतोडणी टोळ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HRADLINES
1. जिल्हा बँकेचे कारभारी ६ मार्चला ठरणार
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी सहा मार्चला संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या सूचनेनुसार संचालकांना शुक्रवारी संध्याकाळी सभेची विषयपत्रिका पाठवण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी बँकेच्या स्वर्गीय मारुतराव घुले पाटील सभागृहात सहा मार्चला दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे.
2. रावतळे येथे ऊसतोडणी यंत्राला आग
शेवगाव तालुक्यातील रावतळे येथे ऊस तोडणी सुरु असताना ऊस तोडणी यंत्रात बिघाड होवून यंत्राला अचानक आग लागली. या अचानक लागलेल्या आगीत यंत्र जळून खाक झालय . यामुळे यंत्र मालक हनुमंत बारगजे यांचे ७५ लाख रुपयांचे नुकसान झालय, ऊस तोडणीसाठी कामगार मिळत नसल्यामुळे त्यावर उपाय म्हणून अनेक साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत .
3. सचिन व मंगेश वराळ यांचा अटकपुर्व जामीन खेड न्यायालयाने फेटाळला
पारनेर तालुक्यातील निघोज येथील सरपंच पदाची निवडणूक असताना दोन दिवस आधी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे आणि गणेश कवाद यांच्या अपहरण प्रकरणाशी गावातील सरपंच सचिन वराळ यांचा संबध असल्याचा निष्कर्ष ठेवत सचिन वराळ आणि मंगेश वराळ यांचा जामीन अर्ज खेड कोर्टाने फेटाळला आहे.
4. ३ लाख ५८ हजारांच्या मुद्देमालासह ५ जणांना घेतले ताब्यात
श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्याना रंगेहाथ पकडुन ८ हजार ७२० रूपये रोख रकमेसह तीन मोटारसायकल असा एकुण ३लाख ५८ हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
5. नववधूची बिदाई चक्क बैलगाडीतून
इंधन दरवाढीचा परिणाम आता लग्नसोहळ्यांवर देखील दिसून आलाय. असाच एक प्रकार संगमनेरमध्ये घडल्याचे पाहायला मिळालय. संगमनेर मध्ये वर्हाडी मंडळींकडून वधूला सासरी आणण्यासाठी चक्क बैलगाडीचा वापर करण्यात आलाय.
6. चोरट्यांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी
19 नोव्हेंबर 2020 ला नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवी मंदिराच्या गाभाऱ्यातील 17 किलो वजनाच्या चांदीची चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेला तब्बल तीन महिने झालेत मात्र ,चोरटे पोलिसांना अजूनही सापडलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
7. ऊसतोडणी टोळ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोड करण्यासाठी एकरी चार हजार रुपयांची मागणी केली जात आहे. मागणी मान्य न केल्यास टोळी मुकादम वेगवेगळी कारणे देऊन ऊसतोड करण्यास दुसऱ्या गावी जाणार असल्याचं सांगून अडवणूक करत आहेत.
8. कोल्हारच्या लोकवस्तीत बिबट्याची दहशत
कोल्हार - बेलापूर रस्त्यालगत सुरेश केशवराव यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने ताव मारलाय. तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी तीन बिबट्यांचा मुक्काम होता. एका शेळी ची शिकार करून पुन्हा आगमनाची चाहूल दिल्याने कोल्हार च्या लोकवस्तीत बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
9. बाजार समित्यांच्या निवडणुकीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसे आदेश सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील काही बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
10. ४ सराईत गुन्हेगारांची टोळी दीड वर्षासाठी हद्दपार
राहुरी फॅक्टरी येथील चौघा सराईत गुन्हेगारांच्या टोळीला दीड वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल आहे. टोळीचा प्रमुख मनोज डोंगरे, स्वप्निल बोरडे, बाबासाहेब वरखेडे, आदिनाथ जाधव असं हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुरी पोलीस ठाण्याने पाठवलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निर्णय घेत ही कारवाई केली आहे.
No comments
Post a Comment