27 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEALINES
1. विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा अटकेत.
अकोला शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाने विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास रंगेहात अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकाजवळ एक जण विदेशी बनावटीचे पिस्टलसह येत आहे. त्याच्याकडे पिस्टल असून तो त्यांचा वापरही करू शकतो.
2. संचारबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व भाजप आमदारानी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा.
अकोल्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढविलेल्या संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटना आणि भाजप आमदारांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. संचारबंदी वाढविल्यापेक्षा दुकाने जास्तवेळ उघडी ठेवण्यास परवानगी दिली तर कोरोना संसर्ग कमी होईल.तसेच व्यापाऱ्यांचे ही आर्थिक नुकसान होणार नाही,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
3. पाचोरा तालुक्यातील घटना

पिंपळगाव हरेश्वर येथील एका दलित कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर एका महिलेच्या मदतीने जिवे मारुन टाकण्याची धमकी देत शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडून आरोपी गोपाल पाटील याच्या शेतातील पत्री शेडमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला यातून ती गरोदर राहून तिने एका मुलीला जन्म दिला आहे.
4. संत रविदास महाराज यांच्या जयंती
4. संत रविदास महाराज यांच्या जयंती
संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.. तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
5. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप
चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 तारखेला हरभरा मोजणी दरम्यान राडा झाला असून सदर शेतकऱ्याचा हरभरा व्यापाऱ्याने सहा हजार तीनशे रुपये भावाने खरेदी केला व हरभराचे जवळपास 90 टक्के मोजणी सुद्धा झाली असताना व शेवटी हरभरा थोडाफार मोजणीचा शिल्लक असतांना त्या मालाचा पुन्हा लिलाव करून भाव ठरविणार व नन्तर मोजणी करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले या कारणावरून बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
6. चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन
चोपडा - येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडीच्या वतीने पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची योग्य ती चौकशी व्हावी तसेच शिवसेनेचे नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या द्यावा म्हणून होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरा जवळील धरणगाव नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
7. ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हटले गेलेल्या ख्रिस गेलचा आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे.
8. "मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
9. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले 'कारण'
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय.
10. मराठीच्या मुद्द्यावरून भाजपचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप
आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत आहे,' अशी विखारी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

No comments
Post a Comment