27 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा; बैठक होण्याची शक्यता....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.
5. अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना
विदर्भातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचं वाढणारं प्रमाण प्रशासनाची झोप उडवणारं आहे. अमरावती जिल्हात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाही.
6. तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या
कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे.
गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमात आले होते.
8. शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे: चित्रा वाघ
मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment