शहराची खबरबात - संगमनेरचा विषय गाजला

News24सह्याद्री - संगमनेरचा विषय गाजला...पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. दिवाबत्तीच्या कामांची चौकशीदलित वस्ती सुधार योजनेतील दिवाबत्तीची कामे निकृष्ट झालेली आहेत. मात्र, प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप शरद नवले यांनी केला. त्याची दखल घेत दिवाबत्तीच्या कामांची चौकशी करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी दिला.
2. संगमनेरचा विषय गाजला
जिल्हा परिषदेची जागा संगमनेर नगरपालिकेला देण्याच्या मुद्द्यावरून राजेश परजणे व अजय फटांगरे यांच्यात खडाजंगी झाली. हा विषय ऐनवेळच्या विषयात घेण्यात आला असून, याबाबत सभागृहाला माहिती का दिली गेली नााही, असा प्रश्न परजणे यांनी केला.
3. राज्य सरकारी कर्मचार्यांनी पाळला निषेध दिन
केंद्र सरकार कोरोना महामारीची ढाल पुढे करुन कामगार विरोधी धोरण राबवित असल्याच्या निषेधार्थ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने निषेध दिन पाळण्यात आला.
4. घरफोडी व मोटारसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात रात्रीची घरफोडी करणारा व मोटारसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला पाथर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली
5. शहर पोलीस आणि महानगर पालिकेडून व्यावसायिकांचे प्रबोधन
अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली असून शहर पोलीस आणि महानगर पालिकेच्या पथकाने काल रात्री कापडबाजार चितळे रोड आणि प्रोफेसर कॉलनी चौक येथे येऊन व्यावसायिकांचे प्रबोधन करत मास्क लावण्याचे आव्हान केले.

No comments
Post a Comment