शहराची खबरबात - मनपाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी?

News24सह्याद्री - मनपाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी?...पहा शहराची खबरबात मध्ये
1. आई - वडील वाऱ्यावर तर पगार मिळेल धारेवर
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कपात करून ती आई-वडिलांच्या खात्यावर वर्ग करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा प्राथमिक बँकेसह ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद कर्मचारी सेवा संस्थेची कर्ज वसुली आगामी निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
2. मनपाचा सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी ?
केंद्र सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी नगरच्या महापालिकेला सात कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र हा प्रकल्प वर्ष उलटूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. काम सुरू होण्याआधीच सल्लागार संस्थेला तीन कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय, पण या संस्थेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने अजूनही कामाला सुरुवात न केल्याने सौर ऊर्जा प्रकल्पाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
3. नियमित कर भरणाऱ्यांना ७५ टक्के सवलत देण्याची मागणी
महापालिकेने थकबाकीदारांना शास्ती मध्ये 75 टक्के सवलत दिली असून शहरातील नियमित कर्ज भरणाऱ्यांना कर वसुली मध्ये 75 टक्के सवलत द्यावी अशी मागणी केडगाव मधील जागरूक मंचाने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळावा यासाठी महापालिकेने शास्ती वर 75 टक्के माफीची योजना मध्यंतरी राबवली होती, या योजनेला प्रतिसादही मिळाला.
4. मनसेकडून हल्लबोलचा इशारा
महावितरण सध्या वसुली भाईगिरी करून सक्तीची वीज बिल वसूली करत आहे. ती तात्काळ थांबवावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सांगळे यांना देण्यात आले आहे.
5. विडी कारखाने व कामगारांचा संप
केंद्र सरकारने 2003 च्या कोटप्पा कायद्यात दुरुस्ती करुन विडी उद्योग बंद करण्याच्या हेतूने घातलेले बंधन आणि जाचक कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन (आयटक), महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, इंटक विडी कामगार संघटना आणि महाराष्ट्र विडी उद्योग संघाच्या वतीने शुक्रवारी एकदिवसीय विडी कारखाने बंद ठेऊन संप करण्यात आलाय .
No comments
Post a Comment