Breaking News

1/breakingnews/recent

21 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24सह्याद्री - बायडन यांच्या शपथेनंतर शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. बायडन यांच्या शपथेनंतर शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी
देशांतर्गत समभागांवर देखील याचा याचा परिणाम होऊ शकतो. यावेळी जागतिक बाजारातील सकारात्मक बाजाराच्या अनुषंगाने सेन्सेक्स पहिल्यांदाच 50,000 च्या पार गेला आहे. तर निफ्टी 14,700 च्या वरच्या पातळीवर तेजीसह बाजारपेठेतील निर्देशांक नवीन उच्च पातळीवर सुरू राहिला.   

2. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार,सरकारचा मोठा निर्णय
 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती उर्जा मंत्री तथा उपसमितीचे सदस्य डॉ नितीन राऊत यांनी दिली. उपसमितीने घेतलेल्या या निर्णयाने 45 हजार मागासवर्गियांच्या पदोन्नतीची मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.

3. एमपीएससीला सुप्रीम कोर्टात जाण्याचा अधिकारच नाही; मराठा आरक्षणाचा वाद चिघळणार? 
एमपीएससीने सर्वोच्च न्यायालयात परस्पर याचिका दाखल करून ‘एसइबीसी’ऐवजी आर्थिक मागास समाजाचे आरक्षण देता येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एमपीएससीला अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकारच नसून एमपीएससी आणि सरकारचीच ही मिलीभगत आहे, असा आरोप  adv गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.   

4. लाल-पिवळा ध्वज हटवण्याचा कोल्हापूर शिवसेनेचा निर्धार
बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज बेकायदेशीररित्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर ठरल्याप्रमाणे अनेक शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भगवा फडकवणारच, असा निर्धार शिवसेनेने केला आहे.  

5. सीरिया बनले जागतिक दहशतवादाचे केंद्र,युनो सुरक्षा परिषदेचे तिरुमुर्ती यांचा इशारा
 दहशतवाद्यांच्या टोळ्या जगभरात पसरत जात आहेत.त्या माध्यमातून दहशतवादाचा आगडोंब कोठेही उडवून देण्याचे षडयंत्र आहे. राजकीय स्थर्य नसल्याचा गैरफायदा उठविला जात आहे. गेल्या आठ वर्षापासून सुरु असलेल्या या परिस्थितीवर समिती तोडगा काढू इच्छिते, असे हि त्यांनी सांगितले.

6. मिनी विंटर! मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल
 मुंबईचे किमान तापमान गुरुवारी १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. परिणामी मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे. मध्यंतरी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाले होते. त्यामुळे मुंबई आणि राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली होती.  

7. 'धक्के पे धक्का'! ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा झटका
 ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.  

8. लसीकरण टाळण्याच्या मानसिकतेत बदल व्हावा ; आरोग्यमंत्र्यांचे मत
'आधी तू लस घे मग मी घेतो' अशी मानसिकता आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये दिसत असून ही मानसिकता दूर करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सगळ्या आरोग्य कर्मचार्‍यांना पाठवले जात आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

9. गटविकास अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केलेल्या ग्रामसेवकचा मृत्यू.     
ग्रामसेवकाचे नाव आहे,गटविकास अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी त्यांनी विष प्राशन केलं होत, ते दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय, गटविकास अधिकाऱ्याकडून सातत्याने त्यांचा छळ केला जात होता ग्रामसेवक संजय शिंदे हे पैठण तालुक्यातील बिडकीन येथे कार्यरत होते..

10. भारतात परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत   
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून भारतात परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर अजिंक्य रहाणे ने केक कापला, यावेळी त्याच्यासोबत रोहित शर्मा टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री  ब्रिस्बेन टेस्ट गाजवणारा शार्दुल ठाकूरआणि पृथ्वी शॉ होते.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *