10 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री -
TOP HEADLINES
1. योगी आदित्यनाथ यांचा धडाकेबाज निर्णय
उत्तर प्रदेशातील 4 सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ शिपाई, वॉचमन आणि सिनेमा ऑपरेटर-असिस्टंट या पदावर पाठवण्यात आलं आहे. या सर्वांनी बेकायदेशीरपणे प्रमोशन मिळवल्याचं सांगण्यात येत आहे.
2. ममतांनी घाबरून मान्य केली 'पीएम किसान योजना' - जे.पी. नड्डा
केंद्र सरकारची पीएम किसान योजना आपल्या राज्यात राबवण्यास अनुमती दिली आहे, असा आरोप भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी केला आहे. तथापि ममतांच्या सरकारला ही योजना राबवण्यासाठी अनुमती देण्यास खूप विलंब झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
3. ‘रोखठोक’मधून संजय राऊतांचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल
नवे कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्याकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाआहे.
4. गुजराती मतांसाठी शिवसेनेचा मेळावा
अंधेरी-ओशिवरा इथल्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ११ गुजराती उद्योगपती शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत.
5. आग विझवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट
अग्निशमन दलाच्या जवानांनीही आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी एका घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले आहेत. 6. पोलीस भरतीसाठी ओबीसी महासंघाचा एल्गार
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे. या मागणीला घेऊन महासंघाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटनाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन सोमवारी केलं जाणार आहे.
7. महाविद्यालयांबाबत २० जानेवारीपर्यंत निर्णय - उदय सामंत
नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून विचारणा करण्यात येत आहे. सामंत यांनी काल समाजमाध्यमावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी महाविद्यालये सुरू करण्याबाबत २० जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
8. औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे लोकार्पण
शहरातील कचरा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. या कचरा प्रकल्पांचे लोकार्पण राज्याचे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते 16 जानेवारी रोजी होणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे.
9. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले
पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर बदलले होते. बदलत्या दरांमुळे सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची वाढती किंमत चिंतेचा विषय झाला होता.
ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ठेवले 407 रनचं आव्हान
सिडनीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी ४०७ धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषीत केला. तिसऱ्या दिवसाप्रमाणेच चौथ्या दिवशीही भारतीय संघानं निष्काळजीपणे क्षेत्ररक्षण करत झेल सोडले. त्यामुळे या निष्काळजी क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय संघाला बसला.
No comments
Post a Comment