Breaking News

1/breakingnews/recent

9 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

News24सह्याद्री - पुण्यात पावसाचा 73 वर्षांचा रेकॉर्ड 'ब्रेक'....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. चीनच्या दोन शहरांमध्ये लॉकडाऊन

कोरोना संकटावर लवकर नियंत्रण मिळवल्याचा दावा चीन करत होता. पण चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्ग पसरू लागला आहे. हेबेई प्रांतातील  दोन शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले  आहेत. यामुळे चीन सरकारने हेबेई प्रांतातील या दोन शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. यातील एका  शहराची लोकसंख्या १ कोटी १० लाख एवढी आहे. तर दुसऱ्या शहराची लोकसंख्या ७० लाख आहे. या दोन्ही शहरांची मिळून १ कोटी ८० लाख एवढी लोकसंख्या लॉकडाऊनमुळे घरात बंदीस्त झाली आहे.

2. डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठा झटका
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरनं आणखी एक मोठा झटका दिला आहे. ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची आम्ही समीक्षा केली. त्यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने सांगितलं आहे.

3. सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे पालन करावे-अजित पवार
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.  

4. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना तुर्तास तरी बदलू नका अशी सूचना राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या प्रभारींना केली आहे पण तरीही प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी तीन नाव सुचवण्याचे आवाहन काँग्रेसच्या शक्ती अँपव्दारे केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसने डिजिटल मत मागण्यास सुरवात केल्याचे वृत्त आहे  
5. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाचा फलक फाडल्याने शहरात तणाव
चोवीस तासापूर्वी उद्घाटन झालेल्या ग्रेड सेपरेटरच्या एका मार्गीकेचा नामकरण झालेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक अज्ञाताने फाडल्याने साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी निषेध करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या राजे समर्थकांनी ग्रेड सेपरेटरच्या पुलावरच निषेध सभा घेतली. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे अॅड दत्ता बनकर, नगरसेवक किशोर शिंदे, संग्राम बर्गे, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यावेळी उपस्थित होते
6. पुण्यात पावसाचा 73 वर्षांचा रेकॉर्ड 'ब्रेक'
शहरात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. गेल्या 12 तासांत शहरात 32.5 मिलिमीटर पावसाची उच्चांकी नोंद झाली. तर, या पावसाने सुमारे 73 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ झाली. तर, शनिवारीदेखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  
7. लोहगाव आणि धानोरीला आजपासून मिळणार भामा आसखेडचे पाणी
बहुप्रतिक्षित भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतून आजपासून पूर्व भागाला पाणी पुरवठा सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात धानोरी आणि लोहगाव परिसराला पाणी मिळणार असून त्यामुळे आता लोहगावकारांना आठ दिवसांऐवजी तीन दिवसांनी पाणी मिळणार आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी यासंबंधीची माहिती दिली.  
8. येरवडा पुणे पालिका रुग्णालयात 'ड्राय रन'
कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात केंद्र सरकार लवकरच करणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून राज्यातील अनेक महापालिकेच्या रुग्णालयात शुक्रवारी लसीकरणाची 'ड्राय रन' म्हणजेच रंगीत तालीम घेण्यात आली. येरवडा येथील पुणे महापालिकेच्या भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालयातही अशी रंगीत तालीम घेण्यात आली. या ड्राय रनमध्ये 25 आरोग्य कर्मचाऱ्यांवर लस वगळता इतर संपूर्ण प्रक्रियेची रंगीत तालीम घेण्यात आली.  
9. परभणीत बर्ड फ्लूच्या भीतीचं सावट
 देशभरात सध्या कोरोनाच थैमान सुरु असताना,आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झालेली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रकार आढळलेला नव्हता. मात्र, परभणीतील मुरुंबा गावात गेल्या दोन दिवसापासून कोंबड्यांचा अचानक मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे गावात एकाच खळबळ उडाली आहे. 'बर्ड फ्लू'च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय.
10. लस वाटपाचे पुणे प्रमुख केंद्र
 देशभरात लस पोहोचवण्यासाठी पुणे हे मुख्य केंद्र असणार आहे. तेथूनच अन्य ठिकाणी लसीचे वितरण केले जाणार आहे. पुणे विभागातील शीतगृहांमध्ये एकावेळी सुमारे 25 ते 27 लाख लसींची साठवण करण्याची क्षमता असल्यामुळे या लसीची साठवणूक औंध, ताडीवाला रस्त्यावर कुटुंब कल्याण विभागाच्या शेजारी एक संपूर्ण मजला याठिकाणी करून ते सगळीकडे पाठवण्यात येणार आहे


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *