8 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - मराठा समाजाच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची चर्चा....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. 'अमेरिकन यादवीतली' मोठी बातमी
ट्रम्प यांचे कट्टर समर्थक एशली बेबबिट यांचादेखील मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेमुळे सध्या अमेरिकेत खबळब उडाली असून ट्रम्प यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. या यादवीला प्रत्युत्तर म्हणून त्यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन लवकरात लवकर हटवावे अशी मागणी केली जातेय.
दिल्लीच्या परिघावरील पूर्व आणि पश्चिम महामार्गावर ५ हजार ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर उतरल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला. या ट्रॅक्टर मोर्चाद्वारे दीर्घकाळ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी संघटनांनी दिला आहे. विज्ञान भवनात आज केंद्र सरकारशी बैठकीची आठवी फेरी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
3. MPSC च्या परीक्षा जाहीर
4. विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त
5. ३ दिवसांत आयटीआर भरा, नाहीतर दुप्पट दंड भरा !
9. बेस्ट आर्थिकदृष्टय़ा सक्षम होणार
10. यंदाची संक्रांत गोड होणार, तिळ-गुळाचे दर घसरले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार असल्याची महिती आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्ट अर्जात गुह्यांची माहिती लपवल्याचा दावा करणारी याचिका भाजपचे माजी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती.
अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारी आधी शेवटच्या ३ दिवसांत आयकर विवरण सादर करण्यासाठी सध्या नोकरदार आणि वैयक्तिक करदात्यांची धावपळ सुरु आहे. अन्यथा करदात्यांना दुप्पट बिलंब शुल्क भरावे लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.
7. परळीत मुंडे Vs मुंडे, लेटर वॉरचा भडका
भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं गुरुवारी सांगण्यात आलं. पण, ते तीनही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आलाय. तसं प्रसिद्धी पत्रकच भाजपनं जारी केलं आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजपनं केला आहे.
8. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील भुयारी मार्गाला अखेर मान्यता
महामार्ग विभागाने 12 मीटर रुंद व साडेचार मीटर उंचीच्या भुयारी मार्ग कामाला मान्यता दिली आहे. या कामाचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला इतर अडचणींबाबत आयुक्तांशी बैठक घेणार असल्याचेही सुळे यांनी सांगितले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात याबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत बेस्टला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातून तिळाची आवक वाढली आहे. त्यामुळे तिळ-गुळाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पांढरे तीळ किरकोळ बाजारात 120 ते 130 रुपये किलो आहेत. तर लाल तीळ 150 ते 160 रुपये किलो आहेत. त्यामुळे यंदाची मकरसंक्रांत गोड होणार आहे.
No comments
Post a Comment