News24सह्याद्री -पुणे पालिकेस सोडावे लागणार 200 कोटींवर पाणी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेच्या संसद भवनात हिंसाचार
आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जवळपास चार तास ही झटापट सुरु होती. यामध्ये एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
2. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची 'महत्त्वाची' सूचना देशभरातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, प्राणिगंग्रहालये, अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्प प्रमुखांनी आपल्याकडील वन्यजीवांची काळजी घ्यावी, अशी सूचना केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने दिली आहे.
3. अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले"
न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांनी या याचिकेवरील सुनावणी तहकूब करत असल्याचं स्पष्ट केल्याने पोलिसांनी 15 जानेवारीपर्यंत कारवाई न करण्याचं आश्वासन न्यायालयाला दिलं.
4. मुंबईत नाईट कर्फ्यूला मुदतवाढ नाही
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याने ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेत, २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लागू केला. त्यानुसार, रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती.
5. मुंबई सेंट्रल स्टेशनचे नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार
पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या अशा मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून त्या ठिकाणी नाना शंकरशेठ टर्मिनस असे नामांतर केले जाणार आहे. नामांतराबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून विचारणा केली असता, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सकारात्मक उत्तर दिले असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.
6. मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे
7. भाजप आमदार प्रसाद लाड यांची होणार चौकशी
भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. साधारण 20 दिवसांपूर्वी त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता प्रसाद लाड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे
8. मुंबई मेट्रो कार शेडबाबत ठाकरे सरकारचा निर्णय
समिती मुंबई मेट्रो मार्गिका तीन, चार आणि सहा या तीन मेट्रो मार्गीकांचा एकत्रित कार डेपो करण्यासाठी अभ्यास करेल. समिती एका महिन्यात राज्य सरकारला याबाबत अहवाल सादर करणार आहे
9. पुणे पालिकेस सोडावे लागणार 200 कोटींवर पाणी
पुण्यातील बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने यापुढे मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकावर दिली आहे. त्या बदल्यात व्यावसायिकास महापालिकेच्या वेगवेगळ्या प्रीमियम शुल्कात 50 टक्के सवलत देण्याचा मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, यामुळे महापालिकेस सुमारे 200 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
10. बीएमसीची सोनू सूदविरोधात तक्रार
इमारतमधील बदलासाठी आपण ल्याकडे महापालिकेकडे यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडूनमंजुरीसाठी थांबलं होतं
No comments
Post a Comment