20 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. मांडूळांची तस्करी करणारे दोघे जण अटकेत
आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांची किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दोघा आरोपींकडून दोन जिवंत मांडूळ जप्त करण्यात आली असून या मांडूळांची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
2. टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल
नाशिक-औरंगाबाद राजमार्गाच्या कडेला टोमॅटो आणून फेकून दिल्याची घटना घडली, दुबई, बांग्लादेश या देशात स्थानिक टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात आल्याने भारतातून मागणी बंद झाल्यामुळे जानेवारीत अवघे 20 ते 40 रुपयांपर्यंत बाजार भाव आल्याने उत्पादनखर्च तर दूरच वाहतूक खर्चही निघणे मुश्कील झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय.
3. मराठा आरक्षणावर आजच्या सुनावणीला स्थागिती
सुप्रीम कोर्टात आज प्रीप्रॉनंड सुनावणी होणार होती , मात्र व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती सर्व पक्षकारांनी केल्यानंतर, मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. आता 5 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन की प्रत्यक्ष सुनावणी करायची याबाबत निर्णय घेणार आहे.
4. फेसबुक पोस्ट टाकत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
नोकरी मिळत नसल्याने मनोधैर्य खचल्यामुळे तरुणीने थेट आत्महत्येचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु फेसबुक पोस्ट वेळीच पोलिसांपर्यंत पोहचल्यामुळे तरुणीचा जीव वाचला. 30 वर्षीय तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.
5. पंतप्रधान मोदींनी गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
गुरु गोविंद सिंहानी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलं आणि आयुष्यभर ते आपल्या सिध्दान्तावर ठाम राहिल्याचं पंतप्रधानांनी सागितलं.पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून गुरु गोविंद सिहांना आदरांजली वाहिली.
6. लॉकडाऊनच्या निर्बंधानंतर आता मोठ्या प्रामाणात नोकरभरती होणार
अनेक आयटी कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान मोठ्या प्रमाणात नोकरभरतीची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चार टॉप कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजिज आणि विप्रोने यावर्षी कँपसमध्ये 91,000 जणांची भरती करण्याची योजना आखली आहे
7. भारताचा शेजारील देशांना मदतीचा हात; भेट स्वरूपात पाठवली लस
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.
8. नाशिकमध्ये खासगी कोचिंग क्लासेस आजपासून सुरु होणार
लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेले नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नंतर आजपासून सुरु करण्यात आले आहे. यामुळे क्लास संचालकांसह विद्यार्थ्यांकडूनही समाधान व्यक्त केलं जातय.
9. राजू शेट्टींचा महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात
लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीदिल होते. मात्र दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली”, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.
10. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव
शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली .नागपूरमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केले जाणार आहे.
No comments
Post a Comment