17 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ रेल्वेंना हिरवा झेंडा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कृषी कायदे समितीवर नवे सदस्य नेमण्याची मागणी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांमुळे निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीमधून उर्वरित तीन सदस्यांनाही काढून टाकावे आणि परस्पर सलोख्याच्या आधारे जे काम करतील अशा सदस्यांची समितीमध्ये निवड करावी, अशी विनंती भारतीय किसान युनियन या शेतकरी संघटनेने सर्वोच्च न्यायालयास केली आहे.
2. स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडल्या जाणाऱ्या आठ रेल्वेंना हिरवा झेंडा
देशातील पहिले ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकीट प्राप्त रेल्वेस्थानक आहे..या रेल्वे केवडियाला स्टॅच्यू ऑफ यूनिटी वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगर या शहरांना जोडणार आहेत.
3. पीएम केअर फंड चा हिशोब द्या
आर्थिक मदतीची गरज होती. पीएम केअर फंडात किती निधी जमा झाला आणि किती खर्च करण्यात आला, याचा हिशोब सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी १०० सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र व्दारे केलीये'...
4. बांगलादेशला जे जमले ते भारताला का नाही?; बच्च कडू
आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्याकडे वरील प्रकारे आयातकर लावून स्थानिक शेतकऱ्यांचं होणार्या नुकसानापासून वाचवावं. निर्यातबंदी व आयातीस मोकळे रान उपलब्ध करून देणार्या धोरणांचा आम्ही सक्रियपणे विरोध करणार आहोत,” असा इशारा बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला.
5. महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
एक कार महेश मांजरेकरांची होती. कारला धडक बसल्यामुळे मांजरेकर गाडीतून उतरले आणि त्यांनी एका व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6. आता वेळ झालीये विश्रांती ची
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, अस इशारा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी दिला.
7. जिंतूरची लेक मिसेस एशिया युनिव्हर्स
स्पर्धा राजस्थानमधील जयपूर येथे मिसेस युनिव्हर्स प्रा.लि. तर्फे आयोजित करण्यात आली होती. अंजली यांच्या या यशामुळे परभणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
8. मुळशीत बर्ड फ्लूचा सापडला विषाणू
पशू संवर्धन विभागाच्या मावळ आणि मुळशीतील सर्व टीमच्या सहाय्याने काल संध्याकाळपर्यंत तिथल्या पोल्ट्रीतील सुमारे पाच हजारांहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॅा. सचिन काळे यांनी दिली आहे.
9. बेळगावात हुतात्मा दिन साजरा
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावला जाणार आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बेळगावात प्रवेश दिला जाणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील आज बेळगावात दाखल झाले आहेत.
10. जालन्यात माऊस मॅजिक बिस्कीटमध्ये निघाल्या आळ्या
मालकाने कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले लुटे यांनी कंपनीशी संपर्क साधला असता कंपनी कडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली हे बिस्कीट आमच्या कडे तयार झालं नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलाय या गंभीर बाबीमुळे सर्व सामन्यांचे आरोग्य धोक्यात जाऊ शकते आजार होऊ शकतो त्यामुळे अन्न व भेसळ आधिकारी यांनी या कंपनीवर कार्यवाई करावी अशी मागणी गणेश लुटे यांनी केली
No comments
Post a Comment