Breaking News

1/breakingnews/recent

19 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

         News24सह्याद्री - जिल्हा बँकेवरही आमचाच झेंडा असणार - महसूलमंत्री थोरात..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. वाहने चालवताना मोबाइलचा वापर टाळा
वाहने चालवताना मोबाइलचा वापर टाळावा, गाणे ऐकू नये, वळणावर गाडी व्यवस्थित वळवावी, दारू अंमली पदार्थ सेवन करून बसगाडी चालू नये, असे आवाहन ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले. येथील बस आगारात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान सुरक्षितता मोहीम सप्ताह राबवण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत होते.

2. कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
राहुरी तालुक्यातील कर्जमाफी पासुन वंचित शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे संजय मोकाटे व अमोल मोढे यांनी दिली. भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना पासूनही तालुक्यातील सुमारे साडे आठशे शेतकरी वंचित रहिले आहेत. याबाबत उपपुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थेट भेट घेऊन याबाबत गाऱ्हाणे मांडणार आहे.

3. बंद घर फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास
बंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून गुपचूप प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५६ हजारंचा मुद्देमाल चोरल्याची घटना सुपा येथे घडली आहे.  याबाबत आदेश दीपक बिंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीच्या गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक फौजदार पठाण करीत आहे.

4. कार दुचाकी धडकेत ग्रामपंचायत सदस्य मृत्यू तर पत्नी जखमी
अहमदनगर जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण हे चांगलेच वाढले आहे या अपघातात अनेकांना आपला जीव ही गमावला आहे. तर काही गंभीर जखमी झाले आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने पती ठार तर पत्नी जखमी झाल्याची घटना काल सोमवारी सकाळी घडली. बावपठार नांदूर खंदरमाळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊराव शिवराम भागवत वय ७० यांचे अपघातात निधन झाले तर त्यांची पत्नी इंदुमती भागवत जखमी झाल्या आहेत.

5. जामखेड तालुक्यातील लग्नासाठी आलेली ट्रॅव्हल्स पलटी
नगर महामार्गावरील कडा येथील कर्डिले वस्ती जवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जामखेड येथील पिंपळगाव येथील लग्न समारंभ आटपून आपल्या गावी परत जाणाऱ्या वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स पलटी होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना घडली जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत

6. जिल्हा बँकेवरही आमचाच झेंडा असणार - महसूलमंत्री थोरात
 अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकणार असं दावा करत राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

7. राहुरी तालुक्‍यात प्राजक्त तनपुरे गटाचाच बोलबाला
राहुरी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे गटाच्या  राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या विकास आघाडीने ३१ ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळवले. भाजप ने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले त्यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील व कर्डिले गटाच्या प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे

8. श्रीरामपूर तालुक्यात विखे पाटील, मुरकुटे यांच्या हाती सत्तेची दोरी
श्रीरामपूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये स्थानिक विचीत्र युत्यांमुळे अनेक ठिकाणी सत्तापालट घडवून आले आहे प्रमुख नेत्यांनी निवडणुकांमध्ये सहभाग न घेतल्याने स्थानिक सोयीनुसार विजयाचा गुलाल उधळला गेला. माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि उपनगराध्यक्ष करण ससाने समर्थकांच्या हाती अनेक गावची सत्ता आली काही ठिकाणी अदिक आणि काही ठिकाणी विखे-पाटील समर्थकांचा झेंडा फडकला तर ठराविक गावांमध्ये विखे-पाटील समर्थकांना पराभव पत्करावा लागला

9. गुलाल दिसेल त्याला पोलिसांनी चोपले
राहुरी ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबी वरून गुलाल उधळत डीजे च्या मिरवणूक काढणार यांना पोलिसांनी अडवले पण कुणीच ऐकत नव्हते अखेर दंगल नियंत्रण पथकाने थेट जमावावर हल्लाबोल केला. काठ्यांचा प्रहार होतात कार्यकर्त्यांना पळताभुई थोडी झाली घरात घुसून अंगावर गुलाल दिसेल त्याला बदडले. यावेळी २० जणांना अटक झाली तर पन्नास जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत

10. संगमनेर मध्ये श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन  
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलित केला जात असून संगमनेर तालुक्यातही त्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी श्रिराम मंदिर उभारण्यासाठी मालपाणी परिवाराकडून एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *