Breaking News

1/breakingnews/recent

16 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

        News24सह्याद्री - आमदारांनी आपले वजन वापरून अकोल्याला पाणी द्यावे -  वैभव पिचड...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES

1. २० फेब्रुवारीला जिल्हा बँकेची निवडणूक                        

ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदान होते न होते तोच जिल्हा बँकेची निवडणूक जाहिर झाली असून २१ जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी  मतदान घेण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांनी दिली. उपनिबंधक आहेर यांनी जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या मंगळवारपासून दि १९ जानेवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज स्विकारण्यास प्रारंभ होईल. २५ जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. २७ जानेवारी रोजी प्राप्त अर्जांची छानणी होईल ,२८ जानेवारी रोजी वैध उमेदवारांची सुची प्रसिद्धी, २८ जानेवारीपासून ११ फेब्रुवारीपर्यंत दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठीची  मुदत असेल. १२ फेब्रुवारी रोजी उमेदवारांच्या चिन्हांचे वितरण होईल. २० फेब्रुवारी रोजी मतदान तर २१ फेब्रुवारी रोजी नगर येथेच मतमोजणी करण्यात येउन निकाल जाहिर करण्यात येणार आहे.

2. वृद्धेश्वर कारखान्याच्या तीन जागा बिनविरोध
पाथर्डी तालुक्याची कामधेनु असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तीन जागा बिनविरोध झाल्या असून छाननी प्रक्रियेत त्यात तर उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत 19 जागांसाठी तब्बल 120 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या सर्व दाखल अर्जांची प्रांताधिकारी कार्यालयात छाननी झाली चरित्रात अर्ज अवैध ठरले.

3. शिर्डीतील स्मशानभूमीला नगरपंचायत देणार मोफत सरपण 
नगर पंचायतीच्या वतीने शिर्डी नगर पंचायत हद्दीत होणाऱ्या स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी मोफत सरपण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली. नगरसेवक ,मुख्याधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर काल झालेल्या नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

4. एकाच छताखाली येणार शासकीय कार्यालये 
तहसील कार्यालयसह, पोलिस ठाणे व विविध शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणून जनता व प्रशासनाच्या सोयीसाठी भव्य प्रशासकीय इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बारा वर्षानंतर दुसऱ्यांदा प्रशासकीय मान्यतेसाठी आराखडा व अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे.  त्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे

5. आमदारांनी आपले वजन वापरून अकोल्याला पाणी द्यावे -  वैभव पिचड
अकोले तालुक्यात वळन बंधारे होतीलच, मात्र प्रवरेतील प्रोफाईल वॉल बांधून तालुक्यात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना, जे काम होणार आहे त्याबाबत तालुक्याचे लोकप्रतिनिधी बोलतात त्यापेक्षा प्रोफाइल वॉल बांधून तसेच सरकारदरबारी आपले वजन वापरून तालुक्याला पाणी उपलब्ध करून देणार आहेत की नाही असा सवाल माजी मंत्री वैभव पिचड यांनी उपस्थित केलाय. 

6. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारीपदी शेटे 
शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारीपदी नितीन शेटे यांची निवड झालीये. मागील पाच वर्षांपासून हे पद रिक्त होते. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत कोरोनानंतर निर्माण झालेल्या विविध अडचणींवर चर्चा झाली. तसेच तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या शेटे यांच्यावर कार्यकारी अधिकारपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे देवस्थान तर्फे सांगण्यात आले

7. मुरमाची ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई 
मुरमाची चोरी करून बेकायदेशीरपणे वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पाहिले. त्यापैकी दोन ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. एक ट्रॅक्टर मात्र पथकाच्या हाती लागला त्याच्याविरोधात महसूल विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला. महसूल विभागाने पकडलेला ट्रॅक्टर पाथर्डी पोलिसांकडे देण्यात आला उर्वरित दोन ट्रॅक्टरचा शोध पोलीस घेत आहेत.

8. थकबाकी धारक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा - बागुल
कृषी पंप ग्राहकांचे व्याज व दंड माफ करण्याच्या योजनेचा सर्व थकबाकी धारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अकोले वीज वितरण कंपनीचे उप अभियंता ज्ञानेश्वर बागुल यांनी केल आहे. अकोले तालुक्यातील कृषी पंप ग्राहकांची वीज बिल थकबाकी 148 कोटी रुपयांवर पोहोचली असून अकोले व राजुर विभागाने वसुलीसाठी कंबर कसली आहे

9. कोपरगाव तालुक्यात पुन्हा घरफोडी
कोपरगाव तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरूच असून खिर्डी गणेश परिसरातील दत्तात्रय रोहम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील 20 हजार रुपये रोख रक्कम व दोन तोळे सोने असा लाखो  रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पसार केला. या घटनेची माहिती मिळतच पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला

10. मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन आजपासून सुरू
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून काल 100 क्‍युसेकने रब्बीतील सिंचनासाठी आवर्तन सोडले. आज उजव्या कालव्यातून सायंकाळी सहा वाजता आवर्तन सोडणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे. रब्बीतील सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार कालपासून डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू झाले मात्र ग्रामपंचायत निवडणूक कामासाठी शाखाधिकारी व कालवा निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे उजव्या कालव्याचे आवर्तन आज संध्याकाळी सहा वाजता सोडण्यात येणार आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *