12 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री -
1. नगर तालुक्यात मतदान यंत्रे सिलिंग प्रक्रिया सुरू
नगर तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीमधील 497 सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया होणार आहे त्याची तयारी सुरू करण्यात आली असून मतदान यंत्र सिलिंग व मतदान अधिकार्यांना मतदान यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देणे सुरु झाले आहे तालुक्यातील 56 ग्रामपंचायतींच्या मतदानाची तयारी तालुका निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिजीत केळकर यांनी सुरू केली
2. पारनेर पोलिसांच्या छाप्यात 5068 रु.ची दारू जप्त
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे एक व्यक्ती देशी विदेशी दारूच्या बाटल्या व गावठी हातभट्टीची तयार दारू विनापरवाना बेकायदा चोरून विक्री करताना आढळून आला हि माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असून प्यात 5068 रुपयांची दारू जप्त केली असून आरोपी फरार झाला आहे या प्रकरणी
पो का. गहीनाथ बबन यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे काँ. शेख करत आहे.
3, निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर कर्मचार्यांना बजावली नोटीस
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आलेले 123 कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याने त्यांना तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नोटीस बजावल्या आहेत यामध्ये पंधरा केंद्र अध्यक्ष यांचाही समावेश आहे
4. मुळा सूत गिरणी कामगारांना रक्कम आदा
मुळा सूतगिरणीच्या 220 कामगारांच्या बँक खात्यावर एक कोटी सहा लाख रुपये अधिक जमा करण्यात आले यासह शासनाचेही 47 लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली
5. व्हीआरडीई स्थलांतराची चर्चा निरर्थक
नगर मधील व्ही आर डी ई स्थलांतराचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही याबाबतच्या चर्चा निरर्थक आहेत उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत योजनेतून या संस्थेचे अधिक मजबुतीकरण करण्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले
6. टपाल कार्यालयात 67 हजारांची चोरी
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टपाल कार्यालयाचे कुलूप तोडून चोरांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 67 हजार 557 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत पोस्टमास्टर अश्विनी विलास लुटे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला टपाल कार्यालयाचे कुलूप तोडून चोरांनी रोख रक्कम व कपाटातील सोन्याचा हार सोडून नेला असे फिर्यादीत म्हटले आहे
7. अवकाळी ची पतंगशौकिनांवर संक्रांत
गेल्या महिन्यापासून निर्माण होणारे ढगाळ हवामान मंदावलेली हवा त्यातच अवकाळी पाऊस व शाळा सुरू झाल्याने पतंग शौकीन आणि विक्रेत्यान्वर संक्रांत आली आहे एरवी मकर संक्रांती दरम्यान आकाशात उडणारे व डोलणारे रंगीबेरंगी पतंग सध्या जमिनीवरच विसावले आहेत पतंग व अनुषंगिक साहित्याची विक्री निम्म्याने घटल्यामुळे विक्रेते सध्या चिंतेत आहेत
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती नंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा असून त्यामुळे एकरकमी लाभाबरोबरच दरमहा पेन्शन मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वाखाली नेवासे पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
साईबाबा देवस्थान व शिर्डीच्या विकासाचा आराखडा नुकताच साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सादर केला असून त्यात देशातील सर्वात मोठी गोशाळा सुरू करून प्रसादासाठी लागणाऱ्या तुपाची गरज पूर्ण करण्याची तसेच भव्य कॅन्सर हॉस्पिटल ची उभरणी व अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था व परिसरातील धार्मिक स्थळांचा विकास आदींचा समावेश आहे
No comments
Post a Comment