15 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - दामदुपटीच्या आमिषाने सहा कोटी 81 लाखांना गंडा
TOP HEADLINES
1. चोरांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
गणेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या चोरट्यांच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. सर्वानी मतदानाचा हक्क बजवावा - तहसीलदार
आवाहन राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
3. दामदुपटीच्या आमिषाने सहा कोटी 81 लाखांना गंडा
फिर्यादीवरून सहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे करत आहेत
4. मुंडे यांच्यावरील तक्रारीबाबत पोलिसांनी सत्य समोर आणावे - चित्रा वाघ
एका महिलेने केलेल्या आरोप हा ब्लॅकमेलिंग चा प्रकार आहे की खरंच तिच्यावर अत्याचार झाले आहेत, हे समोर यायला हवे असे वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी काल मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सायंकाळी साई दरबारी हजेरी लावली यावेळी त्या बोलत होते
5. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत देणार - आ. रोहित पवार
आत्महत्याग्रस्त कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देऊ, कुटुंबातील एका सदस्याला साखर कारखान्यात नोकरी देईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली
6. 'ज्ञानेश्वर' च्या 11 विरोधकांच्या याचिकेवर निर्णय राखीव
नेवासा तालुक्यातील लोकनेते घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. कारखान्याचे 21 जागांसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
7. काँग्रेसचा उद्या नागपुरात राज भवनाला घेराव - महसूलमंत्री थोरात
काँग्रेस कार्यकर्ते उद्या म्हणजे 16 जानेवारी रोजी नागपूर येथील राजभव नाला घेराव घालणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे
8. निविदा नामंजूर केल्याने कोल्हे गटाच्या नगरसेवकांच्या निषेधार्थ आंदोलन
राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी मित्र पक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आणि मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला होता
9. बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी नगर परिषदेचे बांधकामधारकास आदेश
मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी संबंधितांना नोटीस पाठवली आहे. पंधरा दिवसांच्या आत हे बांधकाम काढून टाकावे अन्यथा उचित कारवाई करण्यात येईल अशी नोटीस नगरपरिषदेने संबंधित बांधकामावर लावली आहे
10. राज्य सरकार मका खरेदी करणार - आ.आशुतोष काळे
शासन 31 जानेवारीपर्यंत 15 लाख 18 हजार क्विंटल मका खरेदी करणार आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातुन पुन्हा ही केंद्र सुरू करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे
No comments
Post a Comment