7 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. रॉक संगितावर साधू महाराजांचा देशी डान्स
आपण नेहमीचा साधूंना धार्मिक विधी करताना किंवा धार्मिक गीतं म्हणताना पाहिलं आहे. जास्तीत जास्त एखाद्या भजनावर नाचताना पाहिलं असेल. पण एका साधूने आधुनिकतेला आपलंस करत रॉक संगितावर देशी ठुमके मारले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ अजमेर मधील पुष्करचा असल्याचं म्हटलं जात आहे.
2. अंदमान-निकोबार बेटांवर ऑर्किडच्या 2 नवीन प्रजातींचा शोध
अंदमान-निकोबार बेटांवर 'ऑर्किड'च्या दोन नवीन प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. या संशोधनात भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या संशोधकांचाही सहभाग होता. तुलनेने कमी प्रमाणात ज्ञात असलेल्या अंदमान-निकोबार बेटांवरील जैवविविधतेच्या अभ्यासासाठी हा एक महत्त्वाचा शोध मानला जातो. या दोन्ही ऑर्किड प्रजातींची रचना आतापर्यंत आढळलेल्या ऑर्किड फुलांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. जैवविविधतेच्या दोन हॉटस्पॉटदरम्यान आढळणारी या बेटांवर अजूनही अनेक प्रकारच्या वनस्पती प्रजाती आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी याठिकाणी अजून खोलवर संशोधन करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आलं आहे.
3. चंद्रकांत पाटील यांची केंद्रसरकारवर टिका
सहा महिन्यांपूर्वी तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे आणि ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकऱ्यांचं नुकसान करणारे आहेत, म्हणजे सहा महिने ते काय झोपा काढत होते का ? एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली आणि देश वेठीला धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे.” असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर आज टीका केलीय.
4. बच्चन पांडेमध्ये अक्षयचा रावडी लूक
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा अॅक्शनचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव बच्चन पांडे असे असून या चित्रपटातील नुकताच त्याचा चित्रपटातील राऊडी लूक रिलीज करण्यात आला आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर बच्चन पांडेमधील आपल्या नव्या लूकमधील फोटो अक्षय कुमारने शेअर केला आहे. या लूकमध्ये अक्षय पूर्णपणे नव्या अंदाजात दिसत असून त्याचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे.
5. सोलापूर ते मुंबईचा प्रवास दीड तासांनी कमी होणार
दुहेरीकरण आणि विद्युतीकरणानंतर आता सिग्नल यंत्रणा बळकट करण्यासाठी दौंड ते वाडी या मार्गावर दुहेरी अंतर सिग्नल लावण्याच्या प्रक्रियेला राज्यशासनाचा हिरवा कंदील मिळाला आहे. याशिवाय रेल्वेमार्गाचीही दुरुस्ती केली जात आहे. या डबल डिस्टन्स सिग्नलच्या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या एक्स्प्रेस, पॅसेंजर, मालगाड्या, किसान रेल्वे गाड्यांचा ताशी वेग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर-मुंबईचा प्रवास एक ते दीड तासाने कमी होणार आहे.
6. सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज
बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गांगुलीला सहा दिवसांनंतर हा डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी मी पूर्णपणे ठणठणीत असून मी डॉक्टरांचे आभार मानतो. तसेच माझ्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना केलीत, मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे, अशी पहिली प्रतिक्रिया सौरव गांगुलीने डिस्चार्जनंतर दिलीय.
7. होंडा कंपनी कर्मचाऱ्यांना रिटायर करणार
टू व्हीलर वाहननिर्मिती क्षेत्रात भारतातील आघाडीची कंपनी असणाऱ्या होंडा मोटारसायकल्स अँड स्कुटर्स इंडियाने बुधवारी एक मोठी घोषणा केलीय . त्यानुसार कंपनीने आपल्या काही कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे. कोरोना संकटामुळे होंडा कंपनीच्या दुचाकी विक्रीत मोठी घट झाल्याने कंपनीला नाईलाजाने कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यावा लागला आहे. कंपनीने 5 जानेवारीला आपल्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिलीय.
8. कोरोनाच्या कॉलर ट्यून विरोधात जनहित याचिका दाखल
कोरोनाच्या काळात समोरच्याला फोन लावल्यानंतर पलीकडून अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली कॉलरट्युन अनेक महिने लोकांनी सहन केलीय. मात्र आता या कॉलरट्युनला लोक अक्षरशः वैतागले आहेत. लोकांना कोरोनापेक्षा या कॉलर ट्यूनने जास्त छळलय. या कॉलर ट्यूनविरोधात आता दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान ही कॉलर ट्यून कधी बंद होणार ? असा सवाल एका वैतागलेल्या चाहतीने थेट अमिताभ यांना केला होता. यावर अमिताभ यांनी चक्क तिची माफी मागितली होती.
9. भारताला स्वदेशी लस बनवण्यात मोठं यश
कोरोना लसीबाबत भारताला मोठं यश मिळालं आहे. पहिल्या स्वदेशी लसीच शेवटचं ट्रायलही यशस्वी झालं आहे. भारत बायोटेकनं तयार केलेली कोरोना लस कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. अशी माहिती भारत बायोटेकनं दिली आहे. कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलही पूर्ण झालं आहे आणि भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब असल्याचे बोललं जात आहे.
१०.अकोल्यात दहशतवाद विरोधी पथकाला यूसुफअली खदान परिसरात पेट्रोलीग करीत असताना खत्रिशिर ख़बर मिळाली की कमलसिंग उमरावसिंग बावरी हा त्याच्या घरात तलवार बनवीतो व विक्री करतो अशा माहिती वरून कमलसिंग बावरी याच्या घरी छापा मारला असता घरात 03 तलवार 05 गुप्ति 01 कटयार,रामपुरी चाकू असे धारदार प्राणघातक शस्र मिळून आल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
No comments
Post a Comment