20 जानेवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - एका तासात थाळी संपवा, बुलेट जिंका, पुण्यातील हॉटेलची सुसाट ऑफर...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. कोरोनाच्या लशीबाबात भीती बाळगू नका आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्याने लस घेतली की मी घेतो, अशी मानसिकता दिसून येत आहे. मात्र, त्यांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे लस सुरक्षित असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचेल, असे मत टोपे यांनी व्यक्त केले.
2. वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक
सरकारकडून एका बाजूला वीज बील माफ करण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ऊर्जा मंत्री गोड बातमी देऊ असं सांगतात. 100 यूनिटपर्यंत वीज मोफत देऊ असं सागतात. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आलेले नाही. हे लोकांचे दुश्मन आहेत हे जनेतला कळलं पाहिजे, असं नांदगावकर म्हणाले.
3. "हिंमत असेल तर महावितरणाने घरगुती कनेक्शन तोडून दाखवावं त्यांना."
महावितरणाने घरगुती कनेक्शन तोडून दाखवावं. त्यांना आमच्या परीने उत्तर देऊ, असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. तसेच सरकारशी दोन हात करण्यासाठी देखील आम्ही तयार आहोत. मंत्र्यांना गावात फिरु देणार नाही', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.
4. ट्रॅक्टर रॅलीचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा; दखल देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे, हा मुद्दा पोलिसांचा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
5. एका तासात थाळी संपवा, बुलेट जिंका, पुण्यातील हॉटेलची सुसाट ऑफर
दहा-वीस टक्के सवलतीपासून ‘एकावर एक फ्री’ अशा एकापेक्षा एक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. मात्र पुण्यातील एका रेस्टॉरंटने चक्क बुलेट जिंकण्याचं स्वप्न दाखवलं आहे. विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने दिली आहे.
6. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तकाला ठोकल्या बेड्या!
मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथक (NCB) ने धडक कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहे. चिंकू पठाण (Gangster Chinku Pathan arrested) हा गँगस्टर करीम लालाचा (Karim lala) नातेवाईक आणि हस्तक असल्याची माहिती समोर आली आहे.
7. संसद उपाहारगृहाचे अनुदान बंद !
संसद भवन परिसरातील उपहारगृहात खासदारांना सवलतीच्या दारात येथे जेवण मिळते मात्र आता हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी खाद्यपदार्थांसाठी दिले जाणारे अनुदान रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी दिली.
8. एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी
जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र यावेळी झालेल्या चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव जवानांनी उधळून लावला आहे.
9. आमदाराने पकडून दिला मुद्देमाला सह कोट्यवधी चा अवैध दारूचा साठा,
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पडोली चौकात आमदार जोरगेवार आणि समर्थकांनी गुप्त माहितीवर आधारित अभियान राबविले. यात जिल्ह्यात बेधडक येणारे अवैध दारू वाहने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली गेली. गेले काही महिने जिल्ह्यातील दारूबंदी विरोधातील पोलिस कारवाई थंडावली आहे. त्याचा प्रत्यय या कारवाईने आला.
10. भारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ, जगासमोर आदर्श
विशेष म्हणजे, गेल्या सात दिवसांमध्ये प्रत्येकी १० लाख लोकसंख्येमागे दैनंदिन पातळीवर वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये इतर देशांशी तुलना करता भारतात सर्वात कमी रुग्णांची वाढ होत आहे. भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता पाहता देशासाठी ही अतिशय चांगली बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती जाहीर केली आहे.
11. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी
मराठा आरक्षणावरील स्थगित हटवण्यास नकार देत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, या प्रकरणावर पाच दिवस आधी म्हणजेच आजपासून (२० जानेवारी) सुनावणी होणार आहे.

No comments
Post a Comment