17 जानेवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली : अस्लम शेख....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
\
TOP HEADLINES
1. ड्रग्ज प्रकरणी दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरसह करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दीया मिर्झाची माजी मॅनेजर आणि व्यावसायिक करण सजनानी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या एस्प्लेनेट कोर्टानं हा निर्णय दिलाय. दोघांनाही एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडून एनसीबीला 200 किलो गांजा मिळाला होता.
2. ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू
‘बिग बॉस 14’ च्या विकेंडचा वारसाठी शोची संपूर्ण टीम फिल्मसिटीमघ्ये शूटिंग करत होती. शूटिंग संपल्यानंतर रात्री या शोची टॅलेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली पिस्ता धाकड ही तरुणी आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत घरी जाण्यास निघाली असता, काळोखात अंदाज न आल्यानं अॅक्टिवा स्कूटर एका खड्ड्यात जाऊन अडकली आणि या अपघातात पिस्ता धाकडचा जागीच मृत्यू झाला.
3. ‘तांडव’ला भाजपचा विरोध, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप
तांडव वेबसिरीज बॅन करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. मनोज कोटक यांनी सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना तसं पत्र लिहिलं आहे. त्याचबरोबर वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे

4. खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅप करून भाजप वर आली : अस्लम शेख
मेळाव्यात महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या मेळाव्यात भाषण करताना काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी नवी मुंबईच्या नागरिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं

5. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन रोखठोक भूमिका
औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. हा भाजपचा ढोंगीपणाचा असल्याचा घणाघात बाळासाहेब थोरात यांनी केलाय. तसेच शिवसेनेला मतांची चिंता असल्यानेच औरंगाबाद नामांतरावरुन त्यांचा ‘सामना’ सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला
6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार
मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे बऱ्याच वर्षानंतर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं आहे.
7. घराबाहेर पडण्यासाठीच रस्त्यावर उतरण्याचा बहाणा; शेलारांची खोचक टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाकाळात घराबाहेर पडले नव्हते. घराबाहेर पडता यावे म्हणूनच त्यांनी कृषी कायद्याचा बहाणा शोधला आहे. कृषी कायद्याच्या निमित्ताने बाहेर पडल्यावर लोक त्यांना बघायला येतीलच, अशी बोचरी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

8. मोदी आणि ठाकरेंनी स्वतः लास टोचून घेतली नाही
मोदी आणि ठाकरेंनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही..? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय. अकोल्यातील त्यांच्या निवासस्थानी असलेल्या पत्रकार परिषद मध्ये म्हटलंय..
9. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांचा मुख्यमंत्र्यांवर अचूक निशाणा
फोटोशूट करण्यापेक्षा लसीकरणाची प्रोसेस आणि झालेली तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर चांगलं झालं असतं. दोन दिवसांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम थांबला नसता, असा खोचक टोला संजय निरुपम यांनी लगावला आहे.

10. Jio फोनचे चार प्लान बंद
Reliance Jio ने जिओ फोनचे चार प्लान बंद केले आहेत. हे प्लान विशेष करून नॉन-जिओ व्हॉइस कॉलसाठी उपयुक्त मानले जात होते. Jio कडून बंद करण्यात आलेले चारही प्लान अगदी किफायतशीर होते. यामध्ये जिओ फोनचे ९९ रुपये, १५३ रुपये, २९७ रुपये आणि ५९४ रुपये असे प्लान आता बंद करण्यात आले आहेत.

Tags:
No comments
Post a Comment