11 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - ब्राझीलला हवीये मेड इन इंडिया कोरोना लस...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. शकुंतला नगरमध्ये महिलेचा विनयभंग
फिर्यादी महिलेच्या पतीने आणि सासूने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने शिवीगाळ करत त्या महिलेचा विनयभंग केलाय आणि मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात. यासंदर्भात जालना बाजार पोलिस ठाण्यात 354 , 354 अ, 323 ,504,या भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करन्यात आला आहे . या घटनेचा पुढील तपास सुरु आहे
2. राजेगावमध्ये वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याची अफवा
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे बदनामी करणाऱ्या ग्रामपंचायत उमेदवारांनी मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांची भेट घेऊन जितेंद्र घायतडक, डियल घायतडक आणि आकाश घायतडक यांची जाहीर माफी मागितलीय.
3. कोतुळ पुलावर रस्ता चुकल्याने युवकाला जलसमाधी
रस्त्याची दिशा समजण्यासाठी कोणतेही सूचना फलक याठिकाणी लावलेले नव्हते आणि त्यामुळेच हे नवखे प्रवासी त्याच रस्ताने गेले आणि नाहक एकाला आपला जीव गमवावा लागलाय. या घटनेनंतर किमान आत्ता तरी प्रशासनाने त्या ठिकाणी रस्ता बंद असल्याचे फलक लावावे आणि तेही शक्य नसेल तर दगड गोटे तरी मांडा अशी संतप्त मागणी परीसरातील नागरिक करत आहेत.
4. चीनने नाकारली भारतीय विद्यार्थ्यांना परवानगी
भारतातून चीनमध्ये जाण्यासाठी कोणत्याही चार्टर्ड विमानाला परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे चीनमध्ये परतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल, असे सांगितले जात आहे.
6. संजय राऊत यांची मोदी सरकारवर सडकून टीका
7. माझी सुरक्षा कमी करा - शरद पवार
5. ब्राझीलला हवीये मेड इन इंडिया कोरोना लस
भारताकडून कोरोना लस मिळणार या प्रतीक्षेवर सर्वजण आहेत. अशात ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी भारताच्या पंतप्रधानांकडे लशीसाठी कळकळीची विनंती केली आहे. भारतानं ब्राझीलला कोरोना लशीचे 20 लाख डोस तात्काळ द्यावेत अशी मागणी केली आहे.
बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय? अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी आपल्या सामनातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
सुरक्षेची गरज असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप भाजपचे नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवरून आता माझी सुरक्षा कमी करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून सांगितल्याचे वृत्त आहे
8. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मराठा कार्यकर्ते पानिपतकडे रवाना
भारतातील 17 राज्यासह विदेशातील सुध्दा मराठा बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत..आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंचचे संस्थापक मार्गदर्शक ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वजन पानिपतला रवाना झाले
9. राज ठाकरेंची सुरक्षा काढल्यामुळे मनसे आमदार भडकले
'राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण आहे. राज ठाकरेंना कुठल्याही सुरक्षेची गरज नाही, त्यांच्या सुरक्षेसाठी मनसेसैनिक खंबीर आहेत', अशा शब्दांत राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
10. चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरुन डॉ. साधना तायडे यांना हटवले
No comments
Post a Comment