रवींद्र जाडेजाचा अचूक थ्रो, थ्रो मुळे जाडेजाचे कौतुक
मुंबई -
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात मध्ये तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून फिरकीपटू रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जाडेजाने शतकवीर स्टीव्ह स्मिथला रन आऊट करत ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला. जाडेजाने केलेल्या परफेक्ट थ्रोवर स्मिथ स्ट्राईक एंडला रन आऊट झाला. जाडेजाचे या थ्रो मुळे कौतुक केले जात आहे. जसप्रीत बुमराह सामन्यातील 106 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर स्मिथने फटका मारला. स्मिथने पहिली धावा पूर्ण केली. मात्र तो दुसऱ्या धावेसाठी आग्रही होता.
स्मिथ दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक एंडच्या दिशेने पळाला. पण डीप स्केवअर लेगच्या दिशेला जाडेजा होता. जाडेजाने स्मिथला दुसरा धावा घेताना पाहिले. जाडेजाने थेट थ्रो केला. तो थ्रो परफेक्ट स्टंपवर लागला. अशा प्रकारे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला. जाडेजाच्या या थ्रोचे सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे. जाडेजाने फिल्डिंगसह गोलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी केली. जाडेजाने कांगारुंना आपल्या फिरकीवर नाचवले. जाडेजाने 18 ओव्हर बोलिंग केली. यापैकी 3 ओव्हर या मेडने टाकल्या. जाडेजाने 65 धावा देत महत्वपूर्ण 4 विकेट्स घेतल्या. जाडेजाने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायल या फलंदाजांना आऊट केले.
No comments
Post a Comment