ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात, कांगारुंना 33 धावांची आघाडी
मुंबई -
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी नंतर सिडनीमधील चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ काल पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला असून. पावसाच्या व्यत्ययामुळे काही ओव्हर्सचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे त्या खेळाची भरपाई होण्यासाठी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला (आज) लवकर सुरुवात झाली. आज सकाळी कालच्या 2 बाद 62 धावांवरुन भारताने सुरुवात केली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने धावफलक हलता ठेवून चांगली भागिदारी रचण्यास सुरुवात केली आहे. दोघांनी 45 धावांची भागिदारी करत धावफलकावर टीम इंडियाच्या 105 धावा लावल्या.
परंतु सकाळच्या सत्रात भारताने पुजाराची विकेट गमावली. पुजारा 25 धावांवर जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. टीम इंडियाचा पहिला डाव 336 धावांवर आटोपला आहे. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या भागीदारीने टीम इंडियाचा डाव सावरला. शार्दूल आणि सुंदरने प्रत्येकी अनुक्रमे 67 आणि 62 धावांची झुंजार खेळी केली. या दोघांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीमुळे कांगारुंना दुसऱ्या डावात केवळ 33 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर फिरकीपटू नॅथन लायनने 1 विकेट घेतली.
No comments
Post a Comment